Vastu Shastra : आयुष्यात सुख, समृद्धी हवीये? मग या पाच गोष्टी टाळाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात जर वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्याची नेमकी कारणे काय असू शकतात? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी काय उपाय आहेत? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : आयुष्यात सुख, समृद्धी हवीये? मग या पाच गोष्टी टाळाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 7:31 PM

एखाद्या व्यक्तीसोबत असं घडतं की सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्याच्या प्रगतीला ब्रेक लागतो. त्याला व्यवसायामध्ये तोटा होतो. घरात काहीही कारण नसताना अचानक वादविवाद वाढतात. पत्नी-पत्नीमध्ये पटत नाही. आयुष्यात एक प्रकारची अस्थिरता येते. यामागे त्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण वाढतं, जेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन, नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा ऊर्जा संतुलन बिघडतं यालाच आपण वास्तुदोष असं म्हणतो. जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आज घरातील वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहेत.

घरातील ब्रह्मस्थान – घरातील ब्रह्मस्थानावर कोणतीही जड वस्तू ठेवू नये, तुमच्या घराच्या अंगणातील जो बरोबर मध्य भाग असतो, त्याला ब्रह्मस्थान म्हटलं जातं. सध्या फ्लॅट सिस्टम असल्यामुळे घरात अंगण नसतं, त्यामुळे तुमच्या लिव्हिंग रूममधील जो मध्य भाग आहे, त्याला ब्रह्मस्थान म्हणावं. ब्रह्मस्थानावर कधीही वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नये, बह्मस्थान शक्यतो मोकळ ठेवावं.

घराची पश्चिम दिशा – घराची पश्चिम दिशा ही शनी देवाची दिशा असते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. या दिशेला कोणताही पसारा नसावा, जर तुमच्या घराची पश्चिम दिशा स्वच्छ असेल तर तुमची आर्थिक भरभराट होते.

घराची उत्तर दिशा – उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे, त्यामुळे ही दिशा देखील नेहमी स्वच्छ ठेवावी, तसेच या दिशेच्या भिंतीला कुबेरांचा एक फोटो देखील लावावा, त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधी धन कमी पडत नाही.

घराचे रंग – शक्यतो घराला भडक रंग देणं टाळावं, घराच्या भिंतीला नेहमी लाईट रंग द्यावेत, भडक रंगाचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुळस – घरात तुळस ही असावीच, तुळशीचं झाडं हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अतिशय प्रिय झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, त्या घरता कधीही पैशांची कमी नसते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us