Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही करू नका या चूका, घरात येईल गरिबी

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवाला समर्पित आहे. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सोमवारी करणं वास्तुशास्त्रात अशुभ मानलं गेलं आहे. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही करू नका या चूका, घरात येईल गरिबी
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 9:10 PM

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की शनिवार हा शनी देवांना समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवांना समर्पित आहे. तसाच सोमवार हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. सोमवार हा महादेवांना समर्पित असल्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, त्या या दिवशी करणे हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात ज्या गोष्टी सोमवारी करू नये, असं सांगण्यात आलं आहे, त्या गोष्टी आपण सोमवारी केल्या तर घरात वास्तुदोष निर्माण होऊन तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात. तसेच घरात गरीबी येते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी सोमवारी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केस कापणे – सोमवार हा महादेवांचा वार आहे. त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातो. सोमवार हा महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी कटिंग किंवा दाढी करू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. या दिवशी कटिंग केल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो. भगवान महादेवांची अवकृपा होते, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या दिवशी कटिंग करणं अशुभ माण्यात आलं आहे.

नखं कापणे – सोमवारी नखं देखील कापू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. या दिवशी नख कापणे देखील अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात.

सोमवारी काय करावं? – सोमवारी सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर भगवान महादेव यांच्या मंदिरात जावं, महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करावं. मनोभावे पूजा करावी. महादेवाजवळ कापूर लावावा. तसेच महादेवांना बेलाचे पान हे अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे बेलाचे पान अर्पण करावेत. गंध आणि नवैद्य दाखवावा. शक्य असेल तर उपास करावा, यामुळे महादेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

 

Follow Us