Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झालीये? मग हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय कराच

अनेकदा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा आपल्या आर्थिक, मानसिक तसेच कौटुंबिक अशा सर्व स्थितीवर परिणाम होत असतो. त्यामुळे घरात निर्माण होणाऱ्या अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं.

Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झालीये? मग हे वास्तुशास्त्रामधील सोपे उपाय कराच
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 7:18 PM

अनेकदा आपण आपल्या आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी झाल्याने ऊर्जा संतुलन बिघडतं. जर तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन योग्य नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन टिकवून ठेवणं गरजेच असतं, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे कसं ओळखायचं?

Loading...

अनेकदा आपण अशा काही छोट्या -छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो. त्यालाच आपण वास्तुशास्त्राच्या भाषेत वास्तुदोष असं देखील म्हणतो. जर सर्व सुरळीत सुरू असताना अचानक तुम्हाला पैशांच्या समस्या जाणवू लागल्या, काहीही कारण नसताना तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवत असतील किंवा घरात अचानक गृहकलह वाढले, पती-पत्नीचं पटत नसेल तर घरात वास्तुदोष असू शकतो.

भीमसेनी कापूर – घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. सायंकाळाच्या वेळी तुम्ही जेव्हा देवा समोर दिवा लावता, तेव्हा भीमसेनी कापूर देखील लावावा, आणि हा कापूर देवाला ओवाळल्यानंतर संपूर्ण घरात फिरवावा, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात, नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

खडे मीठ – जर तुम्हाला घरात नकारात्मक ऊर्जेचा त्रास जाणवत असेल तर वास्तुशास्त्रामध्ये हा आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे रात्री झोपताना एका डबीमध्ये थोडं खडे मीठ घ्या आणि ती डबी आपल्या उशीजवळ ठेवा, यामुळे नकारात्मक शक्तिचा त्रास तुम्हाला होणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us