
वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी, वस्तू सांगण्यात आल्या आहेत, त्या जर तुमच्या आसपास दिसल्या तर तो एक तुमच्यासाठी शुभ संकेत असतो, तुमच्यासोबत काही तरी चांगलं घडणार आहे, त्यापूर्वी तुम्हाला असे संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याबद्दल काय सांगण्यात आलं आहे.
शुभ घटना
वास्तुशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, जर सकाळी-सकाळी तुम्ही मंदिरातील घंटीचा आवाज ऐकला किंवा मंदिरात होणारा शंख नाद ऐकला तर तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो, यासोबतच जर तुम्हाला अचानक वाऱ्याच्या झुळुकेसोबत सुगंध आला तर हा देखील एक शुभ संकेत असतो, लवकरच तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडणार आहे, तुमचं नशीब चमकणार आहे, असा त्याचा अर्थ होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, जर सकाळी -सकाळी अशा घटना तुमच्यासोबत घडल्यास तुम्ही त्या दिवशी जे महत्त्वाचं काम करणार असाल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळतं असं मानलं जातं.
हे पक्षी दिसणं शुभ
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या परिसरात घुबड किंवा पोपट दिसला तर तो एक खास संकेत असतो, याचाच अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या धनामध्ये वृद्धी होणार आहे. जर सकाळी-सकाळी या पक्ष्यांचं दर्शन तुम्हाला झालं, तर दिवसभरात तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी नक्की मिळते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
चिमणीचं घरटं
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात चिमणीचं घरटं असेल किंवा चिमणीनं घरटं तयार केलं असेल तर तो एक शुभ संकेत असतो. याचाच अर्थ असा होतो, की लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे, अनेक दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलं असेल तर ते आता लवकरच पूर्ण होणार आहे.
जर तुम्ही घरातून बाहेर पडला आहात आणि तुम्हाला गाय आणि वासरू सोबत दिसलं किंवा वासरू गायीचं दूध पिताना दिसलं तर तो देखील एक शुभ संकेत असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)