Vastu Shastra : ही चार झाडं कधीच घरात लावू नका, घरात सतत होतील भांडणं
वास्तुशास्त्रानुसार घरात काही झाडं लावणं हे अशुभ मानले जातात. जर अशी झाडं घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, घरात शातंता नांदण नाही. जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? एवढंच नाही तर तुम्ही घरात ज्या वस्तू ठेवता त्या वस्तूंची योग्य जागा कोणती, कोणत्या वस्तू घरात असाव्यात? आणि कोणत्या गोष्टी घरात असू नयेत? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही प्रतिमा आणि झाडं असतात, जे घरात ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. कारण या झाडांमुळे घरात काहीही कारण नसातना सतत वादविवाद होतात. पती-पत्नीचं पटत नाही. तसेच तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या देखील येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? आणि ही झाडं नेमकी कोणती आहेत?
निवडूंगाचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही निवडूंगाचं झाड लावू नये, या झाडाला काटे असतात. हे झाड घरात लावणं अशुभ मानलं जातं, कारण हे झाड जर घरात असेल तर या झाडामुळे घरात गृहकलह वाढू शकतो. पती-पत्नीमध्ये भांडणं होऊ शकतात. त्यामुळे हे झाड कधीही घरात लावू नये.
चिंचेच झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही चिंचेच झाड असू नये, कारण या झाडामुळे घरात वादविवाद तर वाढतातच परंतु त्यामुळे घरात आर्थिक समस्या देखील निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
पपईचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या पाठिमागे किंवा एकदम समोर पपईचं झाड नसावं, कारण या झाडामुळे घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
काटेरी वनस्पती – कोणत्याही प्रकारची काटेरी वनस्पती घरात असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात काहीही कारण नसताना वादविवाद निर्माण होतात. तसेच युद्धाचे प्रसंग असलेले फोटो देखील घरात लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)