Vastu Shastra : प्रचंड कष्ट करूनही नोकरी, व्यवसायात मिळत नाहीये यश? मग वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय एकदा कराच

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं, प्रचंड कष्ट करून देखील नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नाही. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात, परंतु जेव्हा तुमच्याभोवती नकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात, वास्तुशास्त्रामध्ये यावर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : प्रचंड कष्ट करूनही नोकरी, व्यवसायात मिळत नाहीये यश? मग वास्तुशास्त्रातील हे सोपे उपाय एकदा कराच
VASTUSHTRA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 9:03 PM

प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्याला नोकरीमध्ये यश मिळालं पाहिजे, आपला व्यवसाय चांगला चालला पाहिजे. आपली भरभराट झाली पाहिजे. परंतु सर्वच गोष्टी या आपल्या मनासारख्या होत नाहीत. काहीजण तर असे असतात जे यश मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करतात, परंतु तरी देखील त्यांना आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळू शकत नाही. यश न मिळण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा देखील तुम्हाला या समस्या जाणवू शकतात. नोकरी, व्यवसायामध्ये चांगलं यश मिळावं, तुमची भरभराट व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात ऊर्जा संतुलन निर्माण होण्यास मदत होईल.

घराची उत्तर दिशा – घराची किंवा ऑफिसची उत्तर दिशा ही फार महत्त्वाची असते. ती नेहमी मोकळी असावी, म्हणजे त्या दिशेला कोणतीही अडचण असू नये, अवजड वस्तू देखील या दिशेच्या कोपऱ्यामध्ये कधीही ठेवू नये. तुमच्या घराची उत्तर दिशा जेवढी मोकळी असेल तेवढी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ऊर्जा दोष कमी होतो, आणि तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश देखील मिळतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Loading...

कामासाठी बसण्याची जागा – तुम्ही काम करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसतात, हे देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही घरून काम करत असाल किंवा ऑफिसमधून काम करत असाल तेव्हा शक्यतो पूर्व दिशेलाच तोंड करून कामासाठी बसावं, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

घराचा मुख्य दरवाजा – घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हाच तुमच्या घरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असतो, त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी पूर्वेलाच असावा असा वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, जर पूर्वेला नसेल तर तो उत्तरेला असला तरी चालेलं, असंही वास्तुशास्त्र सांगतं.

त्याचप्रमाणे घरामध्ये तुललेली भांडी, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक उपकरणं देखील ठेवू नये, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us