Vastu Shastra : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा हा खास उपाय, आयुष्यात कधी धन कमी पडणार नाही

दिवाळी आता जवळ आली आहे, दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे विविध उत्सव असतात. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही खास उपाय केल्यास आयुष्यात कधी धनाची कमी जाणवणार नाही, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा हा खास उपाय, आयुष्यात कधी धन कमी पडणार नाही
Lakshmi Pujan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 9:01 PM

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो. भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला विशेष महत्त्व असतं. वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या आयुष्यातील आर्थिक अडी अडचणी दूर व्हाव्यात, तसेच आर्थिक स्थैर्य लाभावं यासाठी दरवर्षी लक्ष्मीपूजन केलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ते जर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासणार नाही. तुमची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहील, तसेच तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून देखील तुम्ही मुक्त व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते दिवस रात्र प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसाच टिकत नाही. खूप मेहनत करून देखील महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामं असतं. अशा लोकांसाठी वास्तुशास्त्रामध्ये एक खास उपाय सांगण्यात आला आहे, जो की तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकतात. या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल, तसेच तुमची आर्थिक भरभराट देखील होईल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Loading...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आधी मनोभावे लक्ष्मीपूजन करावं, लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी. त्यानंतर लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनावेळी अर्पण करण्यात आलेल्या कवड्या आणि गोमती चक्र घेऊन ते एका लाल कापडामध्ये बांधावं, त्याला हळदी कुंकू वाहावं, त्यानंतर नमस्कार करून ही पोटली मनोभावे तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावी, या उपायामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, आयुष्यात तुम्हाला कधी धनाची कमी भासत नाही, तुमची तिजोरी सदैव पैशानी भरलेली राहाते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us