Vastu Shastra : घरात अडकवलेल्या या 5 वस्तू बनतात वास्तुदोषाचं सर्वात मोठं कारण, वास्तुशास्त्र काय सांगतं?
अनेकदा आपल्या घरात अशा देखील काही वस्तू असतात, ज्यांच्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, जेव्हा एखाद्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा तयार होत असेल, तर अशा घरातून हळुहळु सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ लागतो, आणि घराचं ऊर्जा संतुलन बिघडतं.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या घराची रचना कशी असावी? स्वयंपाक घराची दिशा कोणती असावी? बेडरुम कोणत्या दिशेला असावी? एवढंच नाही तर तुमच्या घरात ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंची दिशा कोणती असावी? याबद्दलची माहिती देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तुची दिशा चुकते तेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो. एवढंच नाही तर अनेकदा आपल्या घरात अशा देखील काही वस्तू असतात, ज्यांच्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, जेव्हा एखाद्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा तयार होत असेल, तर अशा घरातून हळुहळु सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ लागतो, आणि घराचं ऊर्जा संतुलन बिघडतं, त्यामुळे अनेक संकट येऊ शकतात. चला तर मग आज आपण अशा पाच वस्तूंची माहिती घेऊयात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, अशा वस्तू वेळीच घरातून बाहेर काढण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे वेळ आणि गतीचं प्रतिक आहे. त्यामुळे घरातील भिंतींना कधीही बंद पडलेलं किंवा बिघडलेलं घड्याळ लावलं नाही पाहिजे, कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येऊ शकतात. जर घरात असं घड्याळ असेल तर ते लगेच घराबाहेर काढण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
फुटलेला आरसा – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही फुटलेला आरसा असू नये, घरातील भिंतीला फुटलेला आरसा अडकवणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. कारण आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवण्याचं काम करतो. त्यामुळे कधीही फुटक्या आरशामध्ये तोंड पाहू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
सुकलेली फूलं – अनेक लोकांना घराची सजावट म्हणून भिंतींना सुकलेली फूलं लावण्याची आवड असते, मात्र वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ मानलं जातं. घरात कधीही सुकलेली फूलं ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, असे फूलं घराच्या बाहेर फेकून द्यावीत.
हिंस्र प्राण्यांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींवर कधीही हिंस्र प्राण्यांचे फोटो लावू नयेत, कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा फोटोंमुळे घरात गृहकलह वाढतो, त्यामुळे असे फोटो कधीही घरात लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
जुने कॅलिंडर – वास्तुशास्त्रानुसार कॅलिंडरला देखील काळ आणि गतीचं प्रतिक मानलं जातं. कारण कॅलिंडर आपल्याला वेळ दाखवण्याचं काम करतं. त्यामुळे घराच्या भिंतींवर कधीही जुने कॅलिंडर असू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)