Vastu Tips: वास्तू दोषामुळेही वाढते कर्ज!; कर्जमुक्त होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

| Updated on: Jun 13, 2022 | 9:47 AM

कोणालाच कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते, परंतु अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, त्यांना कर्ज घ्यावे लागते. वाढत्या कर्जामुळे व्यक्ती मानसिक तणावातही राहू लागतो. कधी कधी कर्जाचा बोजा इतका वाढतो (Debt increases due to Vastu dosh) की, काय करावे हेच समजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या समस्येचे कारण तुमच्या घरातील वास्तू दोष (Vastu dosh) देखील असू शकतो. […]

Vastu Tips: वास्तू दोषामुळेही वाढते कर्ज!; कर्जमुक्त होण्यासाठी करा हे उपाय
Follow us on

कोणालाच कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते, परंतु अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, त्यांना कर्ज घ्यावे लागते. वाढत्या कर्जामुळे व्यक्ती मानसिक तणावातही राहू लागतो. कधी कधी कर्जाचा बोजा इतका वाढतो (Debt increases due to Vastu dosh) की, काय करावे हेच समजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या समस्येचे कारण तुमच्या घरातील वास्तू दोष (Vastu dosh) देखील असू शकतो. घरातील वास्तू योग्य नसल्यास सर्व प्रकारच्या समस्या वाढू लागतात. वास्तूनुसार जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे (Vastu Tips) कर्ज वाढते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष असल्यास कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते. यामुळे माणूस विनाकारण कर्जाच्या कचाट्यात अडकतो. घराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) मध्ये वास्तुदोष असल्यास खर्च इतका वाढतो की, कर्ज फेडणे कठीण होते. कधी कधी तर सर्वस्वसुद्धा पणाला लागते.

दुसरीकडे घराच्या ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर चुकीच्या मार्गदर्शनामुळे घराचा प्रमुख कर्जात अडकतो. उत्तर दिशेला वास्तुदोष असल्यामुळे शेअर बाजार, जुगार, सट्टा, लॉटरी यातून पैसे कमावण्याच्या लोभापोटी अनेकजण विनाकारण कर्जबाजारी होतात.

वास्तूनुसार घराच्या प्रमुखाची बेडरूम पश्चिम दिशेला असेल तर व्यवसायात नुकसान होते, त्यामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते.

हे सुद्धा वाचा

कर्जापासून मुक्त होण्याचे मार्ग

वास्तूनुसार बाथरूम घराच्या नैऋत्य भागात नसावे. असे म्हटले जाते की या दिशेला स्नानगृह असल्यास कर्जात बुडून जाऊ शकते. नैऋत्य दिशेला स्नानगृह बांधले असेल तर त्याच्या कोपऱ्यात मीठाने भरलेली वाटी ठेवावी. यामुळे वास्तुदोष दूर होतात.

काही लोक जेवण झाल्यावर बऱ्याचवेळ भांडी खरकटी ठेवतात. वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे धनहानी होते आणि कर्जाबरोबर गरिबीही वाढते, असे म्हणतात.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमचे कर्ज  घेतले असेल, तर त्याचा पहिला हप्ता मंगळवारी भरावा. असे केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते.

घराच्या भीतीवर काळे डाग,रेघोट्या आणि अस्वच्छता नसावी यामुळे कर्ज वाढते. घरच्या भिंती कायम स्वच्छ असाव्या. भिंतींचा रंग खराब झाला असल्यास नवीन रंग मारावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)