AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng shui tips: अविवाहित आहात?; मग बेडरूममध्ये चुकूनही ठेऊ नका ‘या’ वस्तू

प्राचीन चिनी शास्त्र फेंगशुईमध्ये (Feng shui) जीवनाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आपण आयुष्याला अधिक सुखकर बनवू शकतो. लोकांना फेंगशुईशी संबंधित अनेक गोष्टी घरात ठेवायला आवडतात. फेंगशुईमध्ये लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल, कासव आणि विंड चाइम यासारख्या अनेक गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. फेंगशुईनुसार या सर्व गोष्टी घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते […]

Feng shui tips: अविवाहित आहात?; मग बेडरूममध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' वस्तू
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 11, 2022 | 1:14 PM
Share

प्राचीन चिनी शास्त्र फेंगशुईमध्ये (Feng shui) जीवनाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आपण आयुष्याला अधिक सुखकर बनवू शकतो. लोकांना फेंगशुईशी संबंधित अनेक गोष्टी घरात ठेवायला आवडतात. फेंगशुईमध्ये लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल, कासव आणि विंड चाइम यासारख्या अनेक गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. फेंगशुईनुसार या सर्व गोष्टी घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा (positive Energy) प्रवाहित राहते. फेंगशुईमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्हाला वैवाहिक संबंध आणि प्रेम वाढविण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये अविवाहित लोकांसाठीही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल (Feng shui tips for unmarried) तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया

अविवाहित लोकांनी बेडरूममध्ये ‘या’ गोष्टी ठेवू नयेत

  1. जर तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरूममध्ये चुकूनही टीव्ही आणि कॉम्प्युटर ठेवू नका. कारण त्यामुळे संवादात खूप अडचणी येतात.
  2. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचे विभाजन असेल, तुमच्या खोलीच्या छताच्या मध्यभागी बीम जात असेल किंवा तुमच्या पलंगावर दोन गाद्या असतील तर या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. फेंगशुईनुसार, तुम्ही बेडवर एकच गादी ठेवावी. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
  3. जर तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरुममध्ये नदी, तलाव, धबधबा इत्यादींची छायाचित्रे ठेवू नयेत.
  4. टॉयलेटचा दरवाजा तुमच्या पलंगाच्या अगदी समोर नसेल याची काळजी घ्या. तसे असल्यास, तो नेहमी बंद ठेवा.
  5. बेडरूममधला आरसा अशा ठिकाणी लावावा की, जिथे तुमच्या पलंगाचे परत दिसणार नाही. पण जर तुमचा आरसा बेडजवळ ठेवला असेल तर तो नेहमी झाकून ठेवावा.
  6. अविवाहितांनीही आपल्या पलंगाचा कोपरा खिडकीला किंवा भिंतीला लागून नसावा याची काळजी घ्यावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते.
  7. पलंगावर कपड्यांचा किंवा वस्तूंचा पसारा ठेऊ नये. याशिवाय बेडरूम नेहमी स्वछ ठेवावी.
  8. खोलीतले जाळे व धुळ वेळोवेळी साफ करावी.
  9. बेडरूममध्ये हवा खेळती राहावी तसेच भरपूर सूर्यप्रकाश यावा याची व्यवस्था करावी.
  10. पलंगावर असलेली चादर आणि उशीच्या खोळी नेहमी स्वच्छ आणि धुतलेल्या असाव्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...