AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FengShui/Vastu Tips for bedroom: बेडरूममधल्या ‘या’ चुका निर्माण करतात वास्तुदोष; पतिपत्नीत होतात भांडणे!

घरांमध्ये सर्व सुख-सुविधा असूनही वैवाहिक जीवन अत्यंत तणावाचे असते. लहान लहान मुद्यांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात.  वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी बेडरूम योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे.

FengShui/Vastu Tips for bedroom: बेडरूममधल्या 'या' चुका निर्माण करतात वास्तुदोष; पतिपत्नीत होतात भांडणे!
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 09, 2022 | 10:54 AM
Share

अनेकांच्या घरात सध्या फेंगशुईचा (FengShui) ट्रेंड पाहायला मिळतो.  लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल्स, कासव, विंड चाइम (wind Chaim) इत्यादी  फेंगशुई (FengShui) सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आणि फेंगशुईनुसार, (FengShui) जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर वास्तुदोष (Vastudosh) टाळू शकतो. बऱ्याचदा आपण पाहतो की,  घरांमध्ये सर्व सुख-सुविधा असूनही वैवाहिक जीवन अत्यंत तणावाचे असते. लहान लहान मुद्यांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात.  वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी बेडरूम योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. यासोबतच घराची दिशा, भिंतींचा रंग, आरसा, शौचालय, फर्निचर इत्यादी गोष्टीही योग्य ठिकाणी असणे आवश्यक असते. या सर्वांच्या असंतुलनामुळे पति-पत्नीमध्ये भांडणे, तणाव, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय वास्तुशास्त्रामध्येही ((Vastushatra) सुखी वैवाहिक जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत, त्यानुसार बेडरूममध्ये काही बदल केल्यास  वैवाहिक जीवन (married life)अधिक सुखकर होऊ शकते.

योग्य दिशेला असावी बेडरूम-

घराच्या उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेडरूम असावी. या दिशेला बेडरूम असल्यास पतिपत्नींचे नाते अधिक घट्ट होते. या दिशेला बेडरूम असल्यास जीवनात प्रेम टिकून राहते. नैऋत्य दिशेला बेडरूम असल्यास पती-पत्नीच्या  कार्यक्षमतेत सतत वाढ होत असते.

या चुका टाळा- 

  1. बेडरूममध्ये शक्यतो डबलबेडचा एकच पलंग असावा, पण काही कारणास्तव दोन पलंग एकत्र ठेवावे लागत असतील तर पलंगाखाली बासरी ठेवावी.
  2. वास्तूनुसार पलंगासमोर आरसा नसावा. असेल तर झोपताना झाकून ठेवा.
  3. शयनकक्षातील फर्निचर लोखंडी, कमानी, चंद्रकोर किंवा गोलाकार नसावे. आयताकृती, चौकोनी लाकडी फर्निचर वास्तूमध्ये शुभ मानले जाते.
  4. वास्तुदोष टाळण्यासाठी बेडरुममधला प्रकाश जास्त प्रखर नसावा. तसेच बेडवर थेट प्रकाश पडू नये. प्रकाश नेहमी मागून किंवा डावीकडून यावा अशी व्यवस्था करावी.
  5. वास्तूनुसार, नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपा, जेणेकरून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रानुसार तुम्हाला दीर्घायुष्य आणि गाढ झोप लाभेल.
  6. बेडरूममध्ये कधीही नद्या, धबधबे, बर्फाचे पर्वत,  किंवा मासोळी यांची छायाचित्रे लावू नका. असल्यास ते लगेच काढा.
  7. बेडरूममध्ये विंड चाइम लावावे. ज्याच्या मधुर ध्वनीने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहील.
  8. पलंगाच्या वरचा भाग म्हणजे ज्या बाजूला डोकं करतो त्याला खेटून खिडकी किंवा भिंत नसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.  तुमच्या बेडरूममध्ये लव्ह बर्ड्स ठेवू शकता.
  9. पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर बेडरूमचा दक्षिण-पश्चिम भाग शक्य तितका सजवा. भिंतींवर गुलाबी, हलका निळा रंग वापरून सकारात्मक ऊर्जा वाढवता येते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...