Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: घरात ‘या’ ठिकाणी ठेवा पिरॅमिड; होईल आर्थिक उन्नती!

कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये आपण एक गोष्ट नक्कीच पहिली असेल, ती म्हणजे त्याचे घुमट हे पिरॅमिड सदृश असते. याचे वैज्ञानिक कारण आहे.

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा पिरॅमिड; होईल आर्थिक उन्नती!
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:28 PM

वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Tips) घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडतो. या गोष्टी लक्षात घेऊन घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या घरात आपण सजावटीसाठी अनेक प्रकारच्या वस्तू ठेवतो, परंतु वास्तुनुसार घरात ठेवलेल्या अनेक सजावटीच्या वस्तू अशा असतात की, त्या योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेने न ठेवल्यास वास्तू दोष (Vastu dosh) निर्माण होऊ लागतात. घर आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. प्राचीन ऋषी-मुनींनी अभ्यासपूर्वक वास्तुशास्त्रावर विश्लेषण केलेले आहे. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे. आजच्या आधुनिक जगातही वास्तुशास्त्राचे नियम पाळणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अनेकांना त्याचा लाभही होतो. वास्तुशास्त्र हे ऊर्जेशी संबंधीत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचावी आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या दूर राहावी यासाठी वास्तूशास्त्राचे नियम उपयोगी ठरतात.

सजावटीच्या वस्तू आणि वास्तू दोष

बहुतेक जण घरात सजवटीसाठी पिरॅमिडचा (pyramid) वापर करतात. घरामध्ये सजावट म्हणून वापरलेला पिरॅमिड योग्य ठिकाणी ठेवल्यास वास्तू दोष (Vastu dosh) दूर होण्यासही मदत होते. चला तर मग जाणून घेऊया वास्तूनुसार पिरॅमिड कोणत्या दिशेला घरात ठेवावा.

  1. वास्तूनुसार घरात पिरॅमिड (pyramid for vastu) ठेवणे खूप शुभ मानले जाते. पिरॅमिड ठेवल्याने घरातील सर्व सदस्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. व्यावसाय आणि नोकरीमध्ये प्रगती झाल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात.
  2. पिरॅमिडमध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तणावग्रस्त किंवा थकलेल्या व्यक्तीने पिरॅमिड जवळ ठेवल्यास त्याचे मन शांत होते आणि सर्व प्रकारचा थकवा दूर होतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. पिरॅमिड ठेवण्यासाठी योग्य दिशा वास्तु तज्ज्ञांच्या मते, घरामध्ये पिरॅमिड ठेवल्याने घरातील अनेक समस्या दूर होतात आणि घरातील वास्तुदोषही दूर होतात. वास्तूनुसार उत्तर दिशेला पिरॅमिडठेवल्यास ते विशेष फलदायी ठरते. असे केल्याने संपत्तीची वृद्धी होते आणि आर्थिक उन्नती होते.
  5. वास्तूनुसार दक्षिण दिशेला पिरॅमिड ठेवल्याने हितशत्रूंपासून संरक्षण होते. महत्वाचे म्हणजे कायदेशीर प्रकरणात अडकलेल्या लोकांनी पिरॅमिड दक्षिण दिशेला ठेवावा. त्याचा फायदा होतो.
  6. पिरॅमिड पूर्व दिशेला ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिड पूर्व दिशेला ठेवल्यास मान-सन्मान आणि कीर्ती वाढते.
  7. धार्मिक स्थळांच्यावर घुमट का असतो? कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये आपण एक गोष्ट नक्कीच पहिली असेल, ती म्हणजे त्याचे घुमट हे पिरॅमिड सदृश असते. याचे वैज्ञानिक कारण आहे. पिरॅमिड कॉस्मिक उर्जेला आकर्षित करते. कॉस्मिक ऊर्जेच्या सानिध्यात सकारात्मक भावना वृद्धिंगत होते, याशिवाय सकारात्मक भावनेने केलेली प्रार्थना आकर्षणाच्या नियमानुसार सत्यात उतरते.(वरील माहिती वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा वाढविण्याचा कुठलाच हेतू नाही)
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....