Vastu Tips : या वस्तु म्हणजे नकारात्मक ऊर्जेचं भंडारच, चुकूनही ठेवू नका घरात

घरात अशा काही वस्तू असतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात कोणत्या वस्तू असू नयेत? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Tips : या वस्तु म्हणजे नकारात्मक ऊर्जेचं भंडारच, चुकूनही ठेवू नका घरात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 9:37 PM

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याची दिशा महत्त्वाची आहे. घराच्या मुख्य दरवाजापासून ते बेडरूमपर्यंत सर्व दिशा या योग्य असाव्यात. त्याच प्रमाणे पूजा कोणत्या दिशेला बसून करावी? घराच्या भिंतींना कोणता रंग असावा? याबाबतचे नियम देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.वास्तुशास्त्र हे फक्त घरांच्या दिशेपूर्ततचं मर्यादित नाहीये, तर तुमच्या घरात कोणतं सामान असावं? कोणतं सामान असू नये? याचे नियम देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरात असं काही सामान असतं, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात कोणत्या वस्तू असू नयेत? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

खराब झालेल्या या वस्तू घरात ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घरात चुकनही बंद पडलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवू नयेत. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार घरात बंद पडलेली घड्याळं, फुटलेला आरसा, तुटलेला पलंग, खराब झालेलं फर्निचर, तसेच तडा गेलेला एखादा फोटो, अशा गोष्टी चुकूनही ठेवू नयेत. या गोष्टी नकारात्मक ऊर्जेच्या वाहक असतात. जर अशा गोष्टी तुमच्या घरात असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्या घरातील वातावरणावर होतो. आरोग्याच्या समस्या वाढतात, धनहानी होते. एवढंच नाही तर सतत वादविवाद होतात. त्यामुळे अशा वस्तु हटवल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं.

घरात जुने वर्तमान पत्र ठेवू नका

अनेकांना सवय असते, घरात येणारे वर्तमानपत्र गोळा करू ठेवले जातात, त्याला आपण रद्दी असं देखील म्हणतो. मात्र वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं असे जुने पेपर घरात ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. या अशा गोष्टींमुळे घरात नकारात्म ऊर्जा प्रवेश करते, त्यामुळे अशा गोष्टी लवकरात लवकर घराच्या बाहेर काढल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)