गंभीरने शब्द फिरवला! शुबमनमुळे संजूला सलग 5 टी 20I सामन्यांमधून डच्चू, प्रिन्समुळे टीम इंडियाला फटका, जाणून घ्या
Sanju Samson vs Shubman Gill : शुबमन गिल याच्या कमबॅकमुळे संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमधून वगळणयात आल्याचं स्पष्ट आहे. तसेच शुबमनलाही काही खास करता आलेलं नाहीय. त्यामुळे शुबमनमुळे तसेच एकूणात संजूवर वारंवार अन्याय होत आहे. तसेच शुबमनमुळे संजूला तडजोड करावी लागतेय आणि या मागे हेड कोच गौतम गंभीर असल्याचा असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

टीम इंडियाचा बॅट्समन शुबमन गिल याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेतून कमबॅक झालं. शुबमनला दक्षिण आफ्रेकिविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅटिंग करताना दुखापत झाली होती. शुबमनला मानेच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलेलं. मात्र शुबमनने टी 20I मालिकेतून कमबॅक केलं. शुबमनच्या कमबॅकनंतर आणि हेड कोच गौतम गंभीर याने बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेल्या बदलांमुळे भारताला दुसऱ्या टी 20I सामन्यात पराभूत व्हावं लागलं. शुबमन दोन्ही टी 20I सामन्यांत अपयशी ठरला. शुबमनला वारंवार फ्लॉप होऊनही संघात संधी मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला चांगली कामगिरी करुनही संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर बसावं लागतंय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये गौतम गंभीर, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांची चर्चा सुरु आहे. चाहत्यांसाठी आता गंभीर आणि शुबमन हे खलनायक झालेत. ...
