
तुमच्या कुंडलीमध्ये असलेली ग्रहस्थिती तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांचं जे स्थान आहे, त्यावरून तुमच्यासाठी येणारे वर्ष कसे असू शकतं? याचा देखील अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच येणारी वर्ष सुखा-समाधानात जावीत, कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या राशीचा जो ग्रह स्वमी असेल त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये पुष्कराज, मोती, नीलम, पाचू अशा काही मौल्यवान रत्नाचा समावेश असतो. मग जेव्हा तुम्हाला अशी रत्न जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो, तेव्हा तुम्ही काय करता, हे रत्न सोने किंवा चांदीच्या अंगठीमध्ये घालता आणि ती अंगठी तुमच्या बोटामध्ये परिधान करतात.
रत्न निवडण्यापासून ते रत्न अंगठीमध्ये घालण्यापर्यंत काही नियम असतात, जे की रत्नशास्त्रामध्ये सगळे सांगण्यात आले आहेत. मात्र अनेक लोक असे असतात की हे नियम पाळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडीअडचणी येतात. तर अनेक जणांना अशी देखील सवय असते की ते दुसऱ्याची रत्न असलेली अंगठी आपल्या बोटात घालतात, मात्र हे रत्नशास्त्र तसेच वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तसं केलं तर समोरच्या व्यक्तीला जो त्रास आहे, तो त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते, तसेच तुमच्याभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते, तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा एखादं रत्न असलेली अंगठी तुमच्या बोटामध्ये घालता, तेव्हा तिला वारंवार बोटातून काढणं अशुभ मानलं जातं. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो. त्याचप्रमाणे आपली अशी अंगठी दुसऱ्या कोणालाच कधीही घालण्यासाठी दिली नाही पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. प्रत्येक रत्नाची एक विशिष्ट ऊर्जा असते, आणि वास्तुशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीतील ग्रहांचं स्थान बघून तुम्हाला ती सुचवलेली असते, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये देखील ग्रहांचं स्थान सारखंच असेल असं नाही. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, आपली अंगठी इतर कोणालाही देऊ नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)