
वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर हे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. याच घरातून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ऊर्जा मिळते. त्यामुळेच स्वयंपाक घराला वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात जसं तुमचं स्वयंपाक घर असेल तसाच प्रभाव घरातील सदस्यांवर पडत असतो. जर तुमचं स्वयंपाक घर हे स्वच्छ असेल, तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा नसेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद राहतो, सुख शांती राहते आणि जर तुमचं स्वयंपाक घर हे अस्वच्छ असेल, तुम्ही जर तुमच्या स्वयंपाक घरात सामान कसंही अस्त-व्यस्त ठेवलेलं असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यावर देखील पाडतो. अनेकदा नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आयुष्य प्रभावीत होतं, घरात नकारात्मक शक्ति प्रवेश करते. जसं की घरात कधीच मीठ आणि तिखट एका जागेवर ठेवू नये, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?
मीठ कुठे ठेवावं?
मीठाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. जर तुम्ही मीठ चुकीच्या जागी आणि चुकीच्या पद्धतीनं ठेवलं तर त्याचा परिणाम हा तुमच्या घरावर होतो, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मीठाला नेहमी काचेच्या भांड्यातच ठेवावे असा सल्ला दिला जातो. मीठ काचेच्या भांड्यात ठेवल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. चुकूनही मीठ लोखंडाच्या डब्यामध्ये ठेवू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात. मीठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नये, त्यामुळे घरात अडचणी वाढतात, वास्तुशास्त्रानुसार दर शुक्रवारी मीठाचा डबा भरू ठेवावा.
तिखट आणि मीठ एकाच जागी ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार कधीच तिखट, आणि मीठ एकत्र ठेवू नये, यामुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. मीठ आणि तिखट एकत्र ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे नेहमी तिखट आणि मीठ हे वेगवेगळ्या जागी ठेवावेत.
हळदीचे नियम
वास्तुशास्त्रानुसार हळद फक्त एक तुमच्या घरात मसाल्यासाठी वापरला जाणारा पदार्थ नाहीये तर त्याचं अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे हळदीचं भांड देखील कधीच रिकामं ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार हळदीच्या डब्यामध्ये रुपयाचं एक नाण आणि तीन लवंगा ठेवल्यास विशेष लाभ मिळतो, घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)