Vastu Tips: फरशी पुसण्याचेही आहेत नियम, या दोन दिवशी महिला करतात सर्वात मोठी चूक

vastu tips, Home vastu tips, mopping vastu tips, mopping and vastu tips, hindu, वास्तु टिप्स, होम वास्तु टिप्स, साफसफाई वास्तु टिप्स, साफसफाईच्या वास्तु टिप्स, हिंदू धर्म

Vastu Tips: फरशी पुसण्याचेही आहेत नियम, या दोन दिवशी महिला करतात सर्वात मोठी चूक
mopping vastu tips
| Updated on: Nov 09, 2025 | 4:59 PM

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खास महत्त्व आहे, त्यामुळे घर बांधताना काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जातो. तसेच कोणत्या भागात कोणती वस्तू ठेवायची याबाबतही वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आलेली आहे. अगदी घरातील फरशी पुसण्याबाबतही नियम आहेत. फरशी पुसताना झालेल्या चुकांमुळे एखाद्या कुटुंबाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. याबाबतचे नियम जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार, सूर्योदयानंतर आणि दुपारपूर्वी फरशी पुसणे शुभ आहे. फरशी पुसण्याची सुरुवात नेहमी प्रवेशद्वारापासून करावी आणि ती आतपर्यंत पुसत जावी. मात्र फरशी पुसण्याचे इतरही वास्तु नियम आहेत. दररोज फरशी पुसणे वास्तूनुसार धाकादायक ठरू शकते. कोणत्या दिवशी फरशी पुसणे टाळावे हे जाणून घेऊयात.

कोणत्या दिवशी फरशी पुसू नये?

  • गुरुवार – वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी फरशी पुसणे टाळावे. गुरूवारी फरशी पुसल्याने गुरुदेव क्रोधित होतात, ज्यामुळे घरात दोष देखील निर्माण होऊ शकतो. मात्र जे लोक गुरूवारी फरशी न पुसण्याचा नियम पाळतात त्यांना शुभ फळे मिळू शकतात. त्यामुळे तुम्हीही हा नियम पाळावा.
  • एकादशी – एकादशीला घराची फरशी पुसणे टाळावे. यामुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच कोणतेही काम सुरू होण्यापूर्वी त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे एकादशीला फरशी पुसणे टाळावे.

साफसफाई करण्याची योग्य वेळ

वास्तुनुसार घराची साफसफाई करण्याची योग्य वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त. हा काळ सूर्योदयापूर्वी सुमारे 1.5 तास आधी सुरू होतो. या वेळी साफसफाई केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे मन शांत होते आणि घरात आनंद दरवळतो. सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच सफाई करणे चांगले मानले जाते, यामुळे घरात समृद्धी नांदते.

साफसफाई कोणत्या वेळी टाळावी?

दुपारच्या वेळी फरशी पुसणे टाळावे, कारण दुपारी सूर्य सर्वोच्च स्थानी असतो. यावळी साफसफाई केल्यामुळे घरात प्रवेश करणारी सौर ऊर्जा पूर्णपणे वापरता येत नाही. तसेच सूर्यास्तानंतर साफसफाई करणे टाळावे, यामुळे घरात नकारात्मकता येते. त्यामुळे तुम्ही घराची साफसफाई करताना वरील नियम नक्की पाळा.