
अभ्यासाची खोली ही घरातील अशी जागा आहे. जिथे आपण कोणताही आवाज न करता शांतपणे अभ्यास करू शकतो. यासाठी अभ्यासच स्टडी रूममध्ये वातावरण चांगले आणि शांतमय ठेवण्याचा प्रयत्न करा.

वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या स्टडी रूममध्ये योग्य रंग निवडणे खूप जास्त महत्वाचे आहे. कारण यामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो.

वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या स्टडी रूममध्ये क्रीम कलर, फिकट जांभळा, हलका हिरवा, आकाशी निळा, हलका गुलाबी किंवा हलका हिरवा रंग चांगला असतो. हे रंग मुलांच्या शिक्षणासाठी खूप फायदेशीर आहेत.

हे रंग एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे स्टडी रूमसाठी हे रंग निवडल्याने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती देखील चांगली होते.

यासोबतच स्टडी रूमसाठी फोटो निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. तुम्ही स्टडी रूमसाठी लावलेल्या फोटोप्रमाणे मुलाचे मनही त्यानुसार अभ्यासात गुंतते.