
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जर तुमच्या घराची दिशा योग्य नसेल किंवा इतर काही गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. जसं की काही कारण नसताना घरात भांडणं होणं, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो घरात टिकून न राहणं, आरोग्याच्या समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या अचानक निर्माण होतात, घरातील असे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. याच उपायांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
वास्तुदोष कसा ओळखायचा?
जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, घरात बरकत नसेल, किंवा काही कारण नसताना अचानक कुटुंबातील कलह वाढला, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वारंवार आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतील तर अशा घरामध्ये वास्तुदोष असू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुमच्या घराची दिशा, बेडरूम कोणत्या दिशेला आहे? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे? इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू आहेत, इथपर्यंतचे घटक महत्त्वाचे असतात.
वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय
आपलं घर आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे आपण विविध सजावटीच्या साहित्याच्या माध्यमातून आपलं घर सजवतो, मात्र घराची सजावट करत असताना तुम्ही जे फुलांचे पॉट, किंवा इतर वस्तूंचा वापर करतात त्या कधीही रिकाम्या ठेवू नका, म्हणजे फुलांच्या पॉटमध्ये नेहमी फूलं असलेच पाहिजे, किंवा त्यात पाणी तरी असावं, ते रिकामे असू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच प्रमाणे तुमच्या घरात कधीही भंगार सामान ठेवू नका असं सामना वेळोवेळी घराच्या बाहेर काढलं पाहिजे, घरामध्ये तुटलेलं -फुटलेलं सामान ठेवू नये, तसेच घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ देखील ठेवू नये, घड्याळाचा संबंध हा वेळेशी असल्यामुळे घरात नेहमी चालू आणि सुस्थितीमध्ये असलेलं घड्याळच असावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराच्या दक्षिण दिशेला नेहमी एक कमळाचं फूलं असावं, घरात तुम्ही ज्या देवी, देवतांच्या मूर्ती ठेवणार आहात, त्याची दिशा देखील योग्य हवी, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)