Vastu Shastra : झोपताना कधीच जवळ ठेवू नका या चार गोष्टी, व्हाल कंगाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
माणसाला झोप गरजेची असते, झोप पूर्ण झाली तरच माणूस पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि ऊर्जेनं कामाला सुरुवात करू शकतो, अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच वास्तुशास्त्रामध्ये देखील या गोष्टी झोपताना जवळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे, अशाच कही गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

असं म्हणतात की आपल्याला जीवनात प्रत्येक गोष्ट ही आपल्या कर्मानुसार मिळत असते. जर तुम्ही कर्म चांगले केले तर तुमच्या घरात सदैव सुख शांती राहते, मात्र वास्तुशास्त्राचा देखील आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. अनेकदा असं होतं की आपलं कर्म चांगलं असतं, आपणं खूप कष्ट देखील करतो, मात्र आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होत नाही, त्यामागे तुमच्या घरात असलेला वास्तुदोष हे देखील एक कारण असू शकतं. जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर घरात कधीही वास्तुदोष निर्माण होणार नाही, आणि घरात सदैव सुख, शांती समृद्धी राहील. बेडरूम ही आपल्या घरातील एक महत्त्वाची जागा असते, तुम्ही ऑफीसमधून थकून आल्यानंतर आराम करण्याचं ते एक तुमच्या हक्काचं स्थान असतं, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बेडरूममध्ये ज्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत, त्याचा प्रभाव हा तुमच्यावर होत असतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, दरम्यान तुम्ही जेव्हा झोपता त्यावेळी तुमच्या जवळ कोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
घड्याळ
झोपताना तुमच्या डोक्याजवळ किंवा बेडरूमच्या भिंतीला घड्याळ असू नये, ते वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा प्रभाव हा तुमच्यावर होतो, आणि तुमचं मन अस्थिर बनतं, मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा घड्याळ तुमच्यापासून थोड्या दूर अतंरावर राहील याची काळजी घ्यावी.
पर्स, पैशांचं पाकिट
अनेकांना सवय असते ते झोपताना आपली पर्स किंवा पैशांचं पाकिट हे बेडवरच किंवा आपल्या शेजारी असलेल्या टेबलवर काढून ठेवतात आणि झोपतात, मात्र वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ मानण्यात आलं आहे, यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना कारवा लागू शकतो.
इलेक्ट्रॉनिक वस्तू
अनेकांना सवय असते की झोपताना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर वस्तू डोक्याजवळच ठेवून झोपतात मात्र ही सवय खूप चुकीची आहे, यामुळे मानसिक तणाव वाढतो, तसेच अशा वस्तूंमधून निघणारे घातक रेडियम तुमच्या शरीराचं मोठं नुकसान करतात, त्यामुळे कधीही झोपताना इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ ठेवून झोपू नये.
पुस्तक डायरी
वास्तुशास्त्रानुसार झोपताना कधीही पुस्तक किंवा डायरी तुमच्या उशीखाली ठेवू नये, अनेकांना ही सवय असते मात्र यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
