Vastu Tips : झोपेतून उठताच या 4 गोष्टी दिसल्या तर समजून जा तुमचा संपूर्ण दिवस वाईट जाणार, वास्तुशास्त्र काय सांगतं?

असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून जागे होतात आणि त्याचवेळी तुमच्या नजरेस काही विशिष्ट गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत असतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Tips : झोपेतून उठताच या 4 गोष्टी दिसल्या तर समजून जा तुमचा संपूर्ण दिवस वाईट जाणार, वास्तुशास्त्र काय सांगतं?
| Updated on: Jun 25, 2025 | 6:28 PM

हिंदू धर्मशास्त्रात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. नवं घर खरेदी करताना किंवा बनवताना वास्तुशास्त्र लक्षात घेऊनच त्या घराची रचना केली जाते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा अनेक मान्यता आहेत, ज्याचा संबंध तुमच्या दिवसाच्या सुरुवातीशी जोडला जातो. असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून जागे होतात आणि त्याचवेळी तुमच्या नजरेस काही विशिष्ट गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत असतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

फुटलेला आरसा किंवा अस्त व्यस्त पसरलेल्या वस्तू

फुटलेला आरसा किंवा तुमच्या घरात अस्त व्यस्त पडलेल्या वस्तू या नकारात्मकतेचं प्रतिक मानल्या जातात. झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला असं दृश्य नजरेस पडलं तर तुमचा दिवस खराब जातो. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात.

मोकळं भांडं किंवा कचऱ्याचा ढीग 

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला घरात कचऱ्याचा ढीग किंवा रिकामं भांडं दिसलं तर तुमचा संबंध दिवस खराब जाऊ शकतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वाईट स्वप्न

जर तुम्हाला तुम्ही गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास वाईट स्वप्न पडले, तरी देखील तुमचा संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो. तुम्ही दिवसभर त्याच स्वप्नाच्या विचारात राहण्याची जास्त शक्यता असते.

भांडण 

तुम्ही झोपेतून उठला आहात आणि तुमच्यासमोरच कोणाचं तरी भाडणं सुरू आहे, असं तुम्हाला दिसलं तर त्यांच्यासोबतच तुमचा दिवस देखील वाईट जाऊ शकतो. कारण वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही घरात भांडण आणि वादविवाद नसावा, याचा मोठा परिणाम हा त्या घरावर होत असतो, तेथील माणसांवर होतो.

वास्तुशास्त्रानुसार जर चुकून अशा गोष्टी तुम्हाला दिसल्याच तर तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करा आणि देवाचं नामस्मरण करा, त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)