Vastu Tips: मोरपंखाचे हे उपाय आहेत अत्यंत फायदेशीर, रातोरात बदलेल नशीब‍!

| Updated on: Jan 14, 2023 | 12:05 PM

घरामध्ये मोरपंख योग्य दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात. तसेच आर्थिक स्थिती सुधारते.

Vastu Tips: मोरपंखाचे हे उपाय आहेत अत्यंत फायदेशीर, रातोरात बदलेल नशीब‍!
मोरपंख
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात (Vastu Tips) मोराचे पंख (Morpankha Upay) शुभ मानले जातात. भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णाची शोभा मोराच्या पिसाशिवाय अपूर्ण आहे. त्याचबरोबर वास्तू तज्ज्ञांनीही मोराच्या पिसांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. घरामध्ये मोरपंख योग्य दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात. तसेच आर्थिक स्थिती सुधारते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि घरात सुख-समृद्धी येते. चला जाणून घेऊया मोराच्या पिसांसंबंधी काही खास उपाय.

 

वास्तूनुसार या दिशेला मोराचे पंख ठेवा

 

हे सुद्धा वाचा

असे मानले जाते की, सर्व देवता आणि नऊ ग्रहांचा मोराच्या पिसामध्ये वास असतो. त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, घरात मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते. याशिवाय घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे नेहमी ठेवावीत. ही दिशा मोराच्या पिसांसाठी शुभ मानली जाते. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहून सुख-समृद्धी नांदते.

 

आर्थिक हानी टळते

 

जर तुम्हीही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा घरात पैसा टिकत नाही अथवा तुम्ही आर्थिक हानीने त्रस्त असाल तर मोराच्या पिसाचा हा उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती देऊ शकतो. पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने विशेष लाभ होतो. पूजेत किंवा मंदिरात ठेवलेल्या मोराच्या पिसामुळे घरात भगवंताचे आशीर्वाद राहतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते.

 

कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल

 

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर मोराच्या पिसाचे हे उपाय केल्यास त्याला लवकर आराम मिळतो. यासाठी व्यक्तीने उशीखाली 7 मोराची पिसे ठेवावीत. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून काल सर्प दोष दूर होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)