
प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या घरात कधीच पैशांची तंगी आली नाही पाहिजे, आपलं आयुष्य आनंदात, सुखा समाधानामध्ये जाईल एवढा पैसा आपल्याजवळ पाहिजे. मात्र अनेकदा पैसा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करून देखील तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तुमच्या घरात पैसा टिकत नाही, अचानक अशा काही समस्या निर्माण होतात, ज्यामुळे तुमच्याकडे असलेला पैसा त्यासाठी खर्च होतो. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण घरावर होतो, नकारात्मक ऊर्जेमुळे घर अस्थिर बनत आरोग्य, आर्थिक, वादविवाद अशा समस्या घरामध्ये निर्माण होतात. ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि तुम्ही कमावत असलेला पैसा तुमच्या हातात टिकून राहवा यासाठी हिंदू धर्मामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
केळीच्या झाडाची पूजा – हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला खूप पवित्र मानण्यात आलं आहे. हिंदू धर्मानुसार केळीचं झाड हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रिय झाड आहे. त्यामुळे केळीच्या झाडाची पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. केळीच्या झाडाची नियमीत पूजा केल्यास त्याला जल अर्पण केल्यास सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहतो आणि घरात कधीच पैशांची कमी भासत नाही, तिजोरी धनाने भरलेली राहते.
सायंकाळच्या वेळी दिवा लावा – हिंदू धर्मानुसार असं म्हटलं जांत की सायंकाळच्या वेळी लक्ष्मी मातेचं घरात आगमन होत असतं, त्यामुळे दररोज सायंकाळच्या वेळी तुमच्या घरात असलेल्या देवघरामध्ये दिवा लावावा. घरात दररोज दिवा लावल्यानं घरात सुख, शांती राहते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात पैशांची आवक वाढते.
तुळशीची पूजा – तुळस ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची प्रिय वनस्पती आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, एवढंच नाही तर तुळस ज्या घरात असते त्या घरात कधीही पैशांची समस्या निर्माण होत नाही, त्यामुळे दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुळशीची पूजा करावी, तिला जल अर्पण करावं, त्यामुळे घरात बरकत प्राप्त होते.
सूर्याला जल अर्पण करा -सूर्य देवाला जल अर्पण करणं हे उत्तम आरोग्य आणि धन वृद्धीचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी सूर्य देवाला जल अर्पण करावं, त्यामुळे हातात आलेला पैसा घरात टिकून राहतो, धनामध्ये वृद्धी होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घराची साफ सफाई – घर नेहमी स्वच्छ ठेवावं, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, अनेक समस्या आपोआप दूर होतात असं वास्तुशास्त्रा सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)