AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : गर्भश्रीमंत व्यक्तीच्या घरी अवश्य असतात या चार वस्तू, पैसा होतो चुंबकासारखा आकर्षित

शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्यात देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने या वस्तू (Vastu Tips) घरात ठेवल्या तर त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते.

Vastu Tips : गर्भश्रीमंत व्यक्तीच्या घरी अवश्य असतात या चार वस्तू, पैसा होतो चुंबकासारखा आकर्षित
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 23, 2023 | 9:56 AM
Share

मुंबई : माता लक्ष्मीला धनाची देवता म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न असते तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्यात देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने या वस्तू (Vastu Tips) घरात ठेवल्या तर त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते. तसेच व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते. अनेक श्रीमंत लोकं या गोष्टी पाळतात. त्यांच्या घरी या गोष्टी अवश्य पाहायला मिळतात. या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

नारळ

नारळ हे लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय असते आणि त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री  हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडण्याची परंपरा आहे. म्हणूनच ते खूप शुभ मानले जाते. घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यासोबतच घरात आर्थिक संकट येत नाही.

शंख

शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख अत्यंत प्रिय आहे. समुद्रमंथनातून शंख मिळाल्याचे सांगितले जाते. देवता आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनादरम्यान 14 रत्ने सापडली, त्यापैकी एक शंख होता. घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

कुबेराचा फोटो

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवी लक्ष्मीसोबत कुबेर यांचे चित्र लावणे शुभ असते.  लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्या चित्रासोबत स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

कमळाचे फूल

शस्त्रांनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. कलमाचे फूल लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की ज्या घरात कमळाची फुले लावली जातात, तिथे लक्ष्मीचा वास असतो. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा तुम्ही तिला कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं