Vastu Upay: वास्तुशास्त्रानूसार ‘या’ चुकीच्या सवयींमुळे होऊ शकते धनहानी, अनेकांना नाही माहिती

| Updated on: Jan 28, 2023 | 3:21 PM

वास्तुशास्त्रानुसार माणसाच्या काही सवयी या कळत-नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. याचा परिणाम माणसाच्या आर्थिक परिस्थीतीवर होतो.

Vastu Upay: वास्तुशास्त्रानूसार या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकते धनहानी, अनेकांना नाही माहिती
वास्तू उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, वास्तूशास्त्रामध्ये (Vastu Upay) अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे ज्याचा थेट परिणाम माणसाच्या जिवणावर होतो. दैनंदिन जिवनात आपण काही चुका करतो ज्याचा थेट परिणाम आपल्या जिवणावर होतो. बऱ्याचदा आपल्याला काही आर्थिक समस्यांनादेखील समोर जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार माणसाच्या काही सवयी या कळत-नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. याचा परिणाम माणसाच्या आर्थिक परिस्थीतीवर होतो. जाणून घेऊया वास्तूशास्त्रानुसार अशा कोणकोणत्या सवयी आहेत ज्या आर्थिक समस्येला कारणीभूत ठरतात. या चुका टाळल्यास धनहानी होणे थांबू शकते.

वास्तुशास्त्रानुसार या चुका ठरताता धनहानीसाठी कारणीभूत

 

स्वयंपाकघरातील खरकटी भांडी

खरकटी भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत असे आपण वऱ्याचदा घरातील मोठ्यांकडून ऐकले असेल. खरकटी भांडी घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते. रात्री स्वयंपाकाच्या ओट्यावर किंवा सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घरात दारिद्र्य राहते.

हे सुद्धा वाचा

पैश्यांचा अपव्यय

वास्तुशास्त्रानूसार जर तुम्ही अनावश्यकपणे पैसे खर्च करत असाल तर यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. पैसा हा चंचल असतो. पैशाचा अनादर केल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. माणसाच्या आर्थिक हानीसाठी हेदेखिल एक कारण आहे.

संध्याकाळी घर झाडणे

वास्तुशास्त्रानूसार संध्याकाळी कधीही घर झाडू नये. कारण मान्यतेनुसार संध्याकाळी लक्ष्मी माता घरात येते आणि त्या वेळी घराच्या दारात कचरा आणि घाण असेल तर लक्ष्मी आल्या पावली परत जाते.

वर्तन किंवा आचरण

वास्तुशास्त्रानूसार जे ज्येष्ठ, विद्वान, महिला किंवा गरिबांना त्रास देतात किंवा त्यांचा सतत अपमान करतात, अशा घरात मां लक्ष्मी कधीही राहत नाही. जे इतरांशी वाईट वागतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी कोपलेली असते. त्यामुळे अशा चुका करणे अवश्य टाळावे. धनहानीसाठी हेदेखील एक कारण आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)