Vat Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार वटपौर्णिमा, मुहूर्त आणि महत्त्व

| Updated on: Apr 07, 2023 | 8:15 AM

वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वट वृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते.

Vat Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार वटपौर्णिमा, मुहूर्त आणि महत्त्व
वट पौर्णिमा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2023) पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे. तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे. देशाच्या काही भागात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते. चला तर मग जाणून घेऊया वट सावित्रीचा उपवास 2023 मध्ये केव्हा पाळला जाईल आणि काय आहे या व्रताचे महत्त्व.

वट सावित्री व्रताची तिथी

वट सावित्री व्रत यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाईल. गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. देशाच्या इतर सर्व भागात वट सावित्री वट जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला केली जाते. पंचांगानुसार 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सकाळी 11 वाजून 17 मिनीटाने पैर्णिमा प्रारंभ होईल व दुसऱ्या दिवशी 4 जूनला सकाळी 9.11 वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. या काळात वड पूजा करता येईल.

वट सावित्री व्रताचे महत्त्व

पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे व्रत ठेवते. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वट वृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)