
Vat Purnima 2025: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2023) पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. काही पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा देखील यामध्ये समाविष्ट आहे. या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते म्हणून याला वट पौर्णिमा असेही म्हणतात.
अनेक राज्यात वट सावित्रीचे उपवास केले जातात. तर महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. जाणून घ्या यावर्षी वट सावित्री पौर्णिमेचे व्रत कधी पाळले जाईल?
पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता सुरू होईल आणि 11 जून रोजी दुपारी 1.13 वाजता संपेल. रात्री चंद्रोदयापासून पौर्णिमेचे व्रत पाळले जाते. म्हणून, 10 जून रोजी वट सावित्री व्रत पाळले जाईल.
यंदाच्या वर्षी, वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:52 ते दुपारी 2:05 पर्यंत आहे. स्नान आणि दान करण्याची वेळ पहाटे 4:02 ते 4:42 पर्यंत असेल. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:45 वाजता असेल.
विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाखाली एकत्रीत येतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. वडाच्या झाडाला 7, 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालतात. दिवा लावतात आणि पूजा झाल्यानंतर, महिला सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकतात. शेवटी, आरती करतात आणि. प्रसाद वाटतात.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वट सावित्रीचे व्रत ठेवते. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले. याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)