Vinayaka chaturthi: आज विनायक चतुर्थी; ‘या’ सोप्या उपायाने होतील आर्थिक अडचणी दूर

| Updated on: Jul 03, 2022 | 10:33 AM

हिंदू दिनदर्शिकेनुसार, विनायक चतुर्थी (Vinayaka chaturthi) व्रत शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला पाळले जाते. हा उपवास भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचाही नियम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच हळदीचे काही उपाय केल्यास फायदा होतो. जेवणाची चव वाढवण्यापासून ते कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. जोतिष्यशास्त्रानुसार […]

Vinayaka chaturthi: आज विनायक चतुर्थी; या सोप्या उपायाने होतील आर्थिक अडचणी दूर
Follow us on

हिंदू दिनदर्शिकेनुसार, विनायक चतुर्थी (Vinayaka chaturthi) व्रत शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला पाळले जाते. हा उपवास भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याचाही नियम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच हळदीचे काही उपाय केल्यास फायदा होतो. जेवणाची चव वाढवण्यापासून ते कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. जोतिष्यशास्त्रानुसार विनायक चतुर्थीच्या (Vinayak Chaturthi) दिवशी हळदीने काही उपाय केल्यास श्रीगणेश सहज प्रसन्न होऊ शकतात. या  उपायांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात धन लाभासोबतच इतरही फायदे  होतील.

हा उपाय हळदीने करा

विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेत श्रीगणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या घ्या आणि श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा उच्चार करताना अर्पण करा. यानंतर 108 दुर्वा घेऊन त्यामध्ये ओली हळद टाकून श्री गजवकत्रं नमो नमः जप करताना अर्पण करा. असे सलग 10 दिवस करा. असे केल्याने अन्नधान्य वाढीबरोबरच नोकरीत पदोन्नतीही होईल.

आर्थिक परिस्थिती ठीक करण्यासाठी

वरद चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासोबत या मंत्राचा जप करावा. यामुळे व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होईल. मंत्र आहे – ओम हस्ति पिशाचिनी लिक्टे स्वाहा

हे सुद्धा वाचा

दुःखातून मुक्त होण्यासाठी

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करण्यासोबतच त्यांना सिंदूराचा तिलक लावावा. तीळ लावताना या मंत्राचा जप करा – ‘सिंदूरं शोभनम् रक्तम सौभाग्यम् सुखवर्धनम्’. शुभदं कामदं चैव सिंदूरम् प्रतिगृह्यम्’

पैशाच्या कमतरतेसाठी

आर्थिक विवंचनेतून सुटका होण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान वगैरे करून श्रीगणेशाची विधिवत पूजा करावी. यासोबतच त्यांना नैवेद्यामध्ये गुळात थोडे तूप मिसळून खाऊ घालावे. असे केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते.

इच्छा पूर्ण करण्यासाठी

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला 21 गुळाच्या गोळ्यांसोबत दुर्वा अर्पण करा. असे केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि उपासकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)