Rushi Panchami: आज ऋषी पंचमी, महत्व आणि पौराणिक कथा

आपल्या पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी ऋषीपंचमीचा सण विशेष मानला जातो.

Rushi Panchami: आज ऋषी पंचमी, महत्व आणि पौराणिक कथा
ऋषीपंचमी पूजा
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 01, 2022 | 12:47 PM

ऋषी पंचमी (Rushi panchami) हा सण भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी व्रत (Vrat) म्हणतात. ब्रह्मपुराणानुसार चारही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे. हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्रायश्चित्त म्हणून केले जाते. मासिक धर्माच्या वेळी नकळत  पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात असे  आपल्या पौराणिक ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी  भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ, कश्यप आणि अत्री या सात ऋषींची (seven Rushi name) आणि अरुंधती देवीची पूजा करावी. त्यानंतर या ऋषींची विधिवत पूजा करावी. या दिवशी लोक सहसा दही आणि देव भात खातात, मीठ वापरण्यास मनाई आहे. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात, त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व  फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही.

 

ऋषीपंचमीची पौराणिक कथा

 

पौराणिक कथेनुसार, उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आणि एक मुलगी. ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले. पण, काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला. यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली. एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती, तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले. हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना माहिती दिली.

उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की, तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती. पण, मासिक पाळीदरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती. मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषीपंचमीचे व्रतही पाळले नव्हते. त्यामुळेच तिची ही अवस्था झाली. यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)