AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक, शिवनेरी गडाहून म्हणाले…

आज राज्यभरात शिवाजी महाराज यांची 396 वी शिवजयंती उत्साह साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे शिवनेरी गडावर पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाले.

अजित पवार यांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक, शिवनेरी गडाहून म्हणाले...
Eknath Shinde and Ajit Pawar
| Updated on: Feb 19, 2026 | 10:58 AM
Share

आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती आहे. राज्यभरात मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रीपासूनच शिवनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन गडावर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरी गडावर पोहोचले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरी गडावर भाषण केले. शिवनेरी गडावर गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांची आठवण आली. भाषणासाठी उभे राहताच एकनाथ शिंदे यांनी भावूक होत म्हटले की, गेल्या वर्षी याठिकाणी दादा आपल्यासोबत होते. यावेळी एकनाथ शिंदे भावूक झाले. एकनाथ शिंदे यांच्या अगोदर सुनेत्रा पवार या भाषणासाठी उभ्या राहिल्या होत्या.

आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत अजित दादा होते… त्यांना सुरूवातीलाच आपण श्रद्धांजली अर्पित केली. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. यावेळी एकनाथ शिंदे भावूक झाले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो.

यशवंत, किर्तीवंत, सामर्थवंत, पुण्यवंत असे आपले जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म दिवस आहे. हिंदुत्वाचा ओंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे युगपुरूष, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती..

आपण आज शिवाजी महाराजांची 396 वी जयंती इथे शिवनेरीवर साजरी करतोय. शिवनेरीवर आल्यावर नवी उर्जा, प्रेरणा, बळ मिळते. दिल्लीच्या जेएनयूमदध्ये शिवरायांवर अध्ययन केलं जातंय. गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाचे कार्य आपण हाती घेणार आहोत. महाराजांची जन्मभूमी आणि जुन्नर तालुक्याचा विकास करण्याचा आम्ही नियोजन केलंय

मोदी शिवरायांचे निस्सीम भक्त आहेत. शिवरायांच्या आदर्शाने आणि प्रेणनेने आपण मार्गक्रमण करतोय. शिवराय काळाच्या पुढे विचाऱ करणारे स्वराज्याचे निर्माते होते. आदर्श राजा कसा आसावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलाय. आपलं सरकारही तसंच काम करतंय. शिवरायांचा एक एक गुण अंगिकारणं गरजेचं आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा