मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसांमध्ये आत्मा कोण-कोणत्या अवस्थेमधून जातो, पाहा गरुड पुराण काय सांगतं?

गरुड पुराणात करण्यात आलेल्या दाव्यानुसार व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराचा त्याग करतो. त्यानंतर आत्म्याला कोण-कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं याची माहिती आज आपण घेणार आहोत.

मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसांमध्ये आत्मा कोण-कोणत्या अवस्थेमधून जातो, पाहा गरुड पुराण काय सांगतं?
गुरुड पुराण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 9:42 PM

हिंदू धर्मामध्ये 18 पुराणं आहेत, त्यामध्येच गरुड पुराणाचा देखील समावेश होतो, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास नेमका कसा होतो? आत्म्याला कोण -कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं? मृत्यूनंतर व्यक्तीचं नेमकं काय होतं? या सर्व गोष्टींचं वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते 13 व्या दिवसापर्यंत गरुड पुराण ऐकवलं जातं, त्यामुळे मृत आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार तो स्वर्गात जाणार की नरकात हे ठरवलं जातं, व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे व्यक्तीनं नेहमी आपले कर्म चांगले ठेवावेत असा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास नक्की कसा होतो? याच वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गरुड पुराणात करण्यात आलेल्या दाव्यानुसार व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराचा त्याग करतो. मात्र जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा तो लगेचच स्वर्गात पोहोचत नाही. तर मृत्यूच्या 13 दिवस व्यक्तीचा आत्मा हा पृथ्वीवरच असतो. गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा यमदूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला घेण्यासाठी येतात, तिथे त्याच्या पाप- पुण्याचा हिशोब होतो. त्यानंतर मृत्यूनंतर पुन्हा 24 तासांनी तो आत्मा पृथ्वीवर येतो. ज्या कुटुंबात त्याचा मृत्यू झाला आहे, त्याच कुटुंबात पुन्हा एकदा तो आत्मा येतो. जेव्हा यमदूत या आत्म्याला पृथ्वीवर पाठवतात तेव्हा तो 13 दिवस प्रेत अवस्थेमध्ये आपल्या प्रियजणांच्या आसपासच घुटमळत असतो.

जेव्हा त्याला आपला मृत्यू झाला आहे, आपण आपल्या शरीराचा त्याग केला आहे, याची जाणीव होते, तेव्हा आत्मा जोरजोरात ओरडून आपल्या प्रिय व्यक्तींना बोलण्याचा प्रयत्न करतो, असं गरुड पुराणामध्ये म्हटलं आहे. मात्र जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते की आता आपण आपल्या शरीराचा त्याग केला आहे, तेव्हा त्याला खूप दु:ख होतं, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)