AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somwati Amavasya 2026: सोमवती अमावस्याच्या दिवशी या वस्तू दान केल्यास मिळते पुण्य, घरात येते सुख-समृद्धि

हिंदू धर्मात दान करण्याला सर्वात जास्त महत्व आहे. दान केल्याने पुण्य मिळत. पण सोमवती अमावस्याच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या सविस्तर

Somwati Amavasya 2026: सोमवती अमावस्याच्या दिवशी या वस्तू दान केल्यास मिळते पुण्य, घरात येते सुख-समृद्धि
| Updated on: Jun 14, 2026 | 3:21 PM
Share

Somwati Amavasya 2026: हिंदू धर्मात दानधर्माला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक श्रद्धेनुसार योग्य वेळी आणि श्रद्धेने केलेल्या दानाचे अनेक पटींनी पुण्यफळ मिळते. विशेषतः सोमवारी येणारी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या अधिक पुण्यदायी मानली जाते. या दिवशी स्नान, जप, पूजा, दान आणि पितृकार्य केल्यास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

यंदा सोमवती अमावस्या 15 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 14 जून रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुरू होऊन 15 जून रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपर्यंत राहणार आहे. उदयतिथीनुसार 15 जूनलाच सोमवती अमावस्या मानली जाणार आहे.

सोमवती अमावस्या विशेष का मानली जाते?

धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते तर सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवारी येते, तेव्हा या दोन पवित्र योगांचा संगम होतो. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. याच कारणामुळे देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. अनेक जण या दिवशी शिवपूजन, रुद्राभिषेक तसेच पितृशांतीसाठी तर्पण करतात.

अन्नदान

सोमवती अमावस्येच्या दिवशी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी यांसारख्या अन्नधान्याचे दान केल्याने घरात अन्नधान्याची आणि आर्थिक समृद्धीची कमतरता भासत नाही. अनेकजण गरजू कुटुंबांना रेशन किंवा धान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपतात.

वस्त्रदान

गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या वस्त्रांचे दान करण्याची परंपरा आहे. काही भाविक साड्या, ब्लँकेट, चादरी तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करून पुण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.

काळे तीळ

अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांचे दान पितृशांतीसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दानामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते आणि पूर्वजांची कृपा प्राप्त होते.

गोसेवा

सोमवती अमावस्येच्या दिवशी गायीला हिरवा चारा, भाकरी किंवा गूळ खाऊ घालण्याची प्रथा आहे. अनेकजण गोशाळांना आर्थिक मदत किंवा चाऱ्याचे दान करतात. गोसेवेने पुण्य प्राप्त होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व सुख-समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि प्रचलित मान्यतांवर आधारित आहे. यातील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा