Premanand Maharaj : जवळचा मित्र शत्रू बनतो तेव्हा… प्रेमानंद महाराजांनी दिलेला मोलाचा सल्ला
आयु्ष्यात मित्र हवेच... कारण काही अडचणी आल्या तर, त्या कुटुबियांना न सांगता आपण मित्रांना सांगतो... पण त्या जवळच्या मित्रानेच फसवणूक केली आणि तोच आपला शत्रू झाला तर.... त्यानंतर काय केलं पाहिजे हे प्र

Premanand Maharaj : मित्रांमुळे आयुष्यात आनंद आणि उत्साह येतो असं म्हणतात, पण त्याच मित्रांनी आपली फसवणूक केली तर काय कराल, जवळचा मित्रच शत्रू झाला तर तुम्ही काय कराल…आयुष्यातील चढ-उतारांमध्ये आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो. काही आपले जवळचे मित्र बनतात, तर काही आपले जिवलग मित्र. पण ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला होता, तोच मित्र अचानक आपला शत्रू बनून आपल्या पाठीत खंजीर खुपसला तर? अशा कठीण परिस्थितीत, वृंदावनचे आध्यात्मिक गुरु श्री प्रेमानंद महाराज यांनी मनःशांती राखून परिस्थिती हाताळण्याचा एक सोपा आणि गूढ मार्ग आपल्याला दाखवला आहे.
प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनांमधून लोकांच्या गुंतागुंतीच्या वास्तविक समस्यांवर सोपे उपाय सांगतात. नुकताच, एका भक्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं, “जर कोणी तुमच्याशी वैरभाव ठेवत असेल, तर तुम्हीही त्यांच्याशी वैरभाव ठेवू नका. हिंसेने प्रत्युत्तर दिल्याने कधीही शांती मिळणार नाही. त्याऐवजी, अशा व्यक्तीपासून पूर्णपणे दूर राहणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे
आध्यात्मिक आणि व्यावहारिक बाबी स्पष्ट करताना महाराज म्हणाले की, प्रत्येकक्तीचे कर्मच त्याचं नशीब ठरवते. जर एखादा मित्र तुम्हाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो खरेतर स्वतःच्याच कर्माला हानी पोहोचवत असतो. म्हणून, शांत राहा, देवावर आणि आपल्या चांगल्या कर्मांवर श्रद्धा ठेवा. जर कोणी काही चुकीचं केलं, तर त्याला निसर्गाच्या नियमानुसार शिक्षा मिळेलच आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःचे हात खराब करण्याची गरज नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली.
सहसा, मित्राच्या विश्वासघातामुळे लोक रागावतात आणि दुःखी होतात व सूडाचा विचार करतात. पण महाराजांच्या मते, अशा परिस्थितीत सर्वात मोठी शक्ती म्हणजे शांत राहणं आणि आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणें. “रागाच्या भरात वाईट शब्द बोलू नका किंवा सूड घेऊ नका. तुमचं मौन हेच त्याच्यापर्यंत पोहोचणारं सर्वात मोठे उत्तर असेल,” असं महाराज म्हणाले.
सूडाच्या आगीत जळून आपण स्वतःचं मानसिक नुकसान करून घेतो. म्हणूनच महाराजांचा सल्ला आहे की, जो मित्र द्वेष निर्माण करतो त्याला सोडून द्या. नाराज होऊ नका, आपल्या चुकांमधून शिका, आयुष्यात पुढे जा आणि आपले मन देवाच्या चरणी समर्पित करा. कारण, सर्वशक्तिमान परमेश्वर सर्व काही पाहतो आणि तोच अंतिम न्यायाधीश आहे, असा त्यांनी सल्ला दिला.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)