Sita Navami 2022: कधी आहे सीता नवमी ? जाणून घ्या तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधीवत पूजेची पद्धत

राम नवमी नंतर ही साधारण एका महिन्याने सीता नवमी येते.

Sita Navami 2022: कधी आहे सीता नवमी ? जाणून घ्या तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधीवत पूजेची पद्धत
सीता नवमी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 1:04 PM

सीता नवमी दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येते. राम नवमी (Ram Navami) नंतर ही साधारण एक महिन्याने येते. यादिवशी सीता माता प्रकट झाल्या असं मानलं जातं. सीता माते प्रकट झाल्या तो दिवस जानकी नवमी (Janaki Jayanti2022) म्हणजेच सीता जयंती (Sita Navami 2022) म्हणून साजरा केला जातो. यादिवशी विधिवत श्री रामाची आणि सीता मातेची पूजा केली जाते. लग्नझालेल्या स्त्रियां यादिवशी आपल्या पतिच्या दिर्घायुष्यासाठी उपवास करतात. असं केल्याने घरात सुख-शांती नांदते. यावर्षी सीता नवमीचा उपवास 10 मे ला करता येईल. यादिवसाचे महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त  जाणून घेऊया.

सीता नवमी 2022 तिथी

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीची सुरूवात 09 मे सोमवार संध्याकाळी 6: 32 ला होईल. नवमी तिथी 10 मे मंगळवार संयाकाळी 7.24 ला होईल. तिथीनुसार सीता नवमीचा उपवास 10 मे ला केला पाहिजे.

सीता नवमी 2022 चा शुभ मुहूर्त

सीता नवमीचा शुभ मुहूर्त 10 मे सकाळी 10:57 ते दुपारी 1: 39 वाजे पर्यंत राहिल. सीता नवमीचा शुभ मुहूर्त 2 तास 42 मिनिटांपर्यंत राहिल.

सीता नवमी म्हणजेच जानकी जयंतीचे महत्व

पैराणिक काथे प्रमाणे एकदा मिथिला नरेश जनक शेतात नांगरणी करत होते. शेतात नांगरणी करत असताना त्यांना सीता माता लहान मुलीच्या रूपात भेटल्या. त्यानंतर सीतेचे लग्न श्री रामांसोबत झाले. लव आणि कुश आशी दोन मुलं त्यांना होती. ज्या सैभाग्यवती स्त्रियां हा उपवास करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते असं मानलं जातं. त्याने तुमच्या पतिला दिर्घ आयुष्य लाभतं. यादिवशी सीता मातेची पूजा केल्याने दान पुण्य आणि तिर्थ यात्रा केल्यापेक्षा अधिक पुण्य लाभते.

सीता नवमीचा पूजा विधी

सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. घराची साफ-सफाई करा. देवघर स्वच्छ करा. एका पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा. यावर श्रीराम किंवा सीता मातेचा फोटो किंवा मुर्ती ठेवा. सीतेच्या प्रतिमेला सुंदर अलंकार आणि हळद कुंकू लावून सजवा. सौभाग्याचा अलंकार सीता मातेला अर्पण करा. त्यानंतर तूप किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावा. अक्षता, फुलं, अगरबत्ती आणि धूप, कापूराने पूजा करा. ओम सीताये नम: मंत्राचा जप 108 करा. लाल, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. मनोभावे प्रर्थाना करा.