Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा

| Updated on: Apr 23, 2021 | 3:04 PM

मुंबई : हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (Pandavas Built Kedarnath Temple) मानलं जातं. हिंदू पुराणात वर्षातील सहा महिने बर्फाने झाकलेले हे पवित्र मंदिर भगवान शंकराचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. येथे भगवान शिव त्रिकोण शिवलिंगच्या रुपात नेहमी विराजमान असतात, अशी मान्यता आहे (Why Pandavas Built Kedarnath Temple Know The Pouranik […]

Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा
Kedarnath Temple
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (Pandavas Built Kedarnath Temple) मानलं जातं. हिंदू पुराणात वर्षातील सहा महिने बर्फाने झाकलेले हे पवित्र मंदिर भगवान शंकराचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. येथे भगवान शिव त्रिकोण शिवलिंगच्या रुपात नेहमी विराजमान असतात, अशी मान्यता आहे (Why Pandavas Built Kedarnath Temple Know The Pouranik Story Of Pandava And Mahadeva).

पौराणिक ग्रंथांमध्ये या धामशी संबंधित अनेक कथा सापडतात, परंतु आज आम्ही तुम्हाला महाभारतातल्या या धामशी संबंधित एक कहाणी सांगणार आहोत, ज्यामध्ये असे सांगितले जाते की भगवान शिव यांनी येथे पांडवांना दर्शन दिले होते. त्यानंतर पांडवांनी येथे हा धाम स्थापन केला.

चला केदारनाथशी संबंधित या रंजक कथेबद्दल जाणून घेऊया –

धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेखल्या गेलेल्या आख्यायिकेनुसार महाभारत युद्धात विजय मिळाल्यानंतर पांडवांपैकी सर्वात मोठे युधिष्ठीर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर युधिष्ठीराने जवळजवळ चार दशकं हस्तिनापूरवर राज्य केले. या काळात एक दिवशी पाच पांडव भगवान श्रीकृष्णासमवेत बसून महाभारत युद्धाचा आढावा घेत होते. या आढाव्यात पांडव श्रीकृष्णाला म्हणाले, हे नारायण, आम्हा भावंडांवर ब्रह्म हत्येसह आपल्या भावांना मारण्याचं पाप आहे.

हा कलंक कसा काढायचा? मग श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की हे खरे आहे की तुम्ही युद्ध जिंकलात, तरी तुम्ही आपल्या गुरु आणि बंधू-बांधवांची हत्या केल्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार झाला आहात. या पापांतून तारण मिळणे अशक्य आहे. परंतु या पापांपासून फक्त महादेवच तुम्हाला मुक्त करु शकतात. म्हणून महादेवाच्या आश्रयालत जा. त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले.

त्यानंतर, पांडव पापांपासून मुक्तीसाठी चिंतेत राहू लागले आणि त्यांनी विचार केला की राजकाज सोडावं आणि महादेवाच्या शरणात जावे.

दरम्यान, एक दिवस पांडवांना कळाले की, वासुदेवांनी आपला देह त्याग केला आहे आणि ते आपल्या परम निवासस्थानात परतले आहेत. हे ऐकून पांडवांनासुद्धा पृथ्वीवर जगणे योग्य वाटले नाही. गुरु, पितामह आणि सखा हे सर्व रणांगणात मागे राहिले होते. आई, वडील, ज्येष्ठ आणि काका विदूरही वनवासात गेले होते. नेहमीच मदत करणारे कृष्णही आता नव्हते. अशा स्थितीत पांडवांनी राज्य परीक्षितच्या ताब्यात दिले आणि हस्तिनापूरला द्रौपदीसह सोडले आणि शिवच्या शोधात निघाले.

हस्तिनापूर सोडल्यानंतर पाच भाऊ आणि द्रौपदी प्रथम भगवान शिवला भेटण्यासाठी पांडवकाशीला पोहोचले. पण तेथे त्यांना महादेवांची भेट झाली नाही. त्यानंतर त्यांनी इतर अनेक ठिकाणी भगवान शिवला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, जिथे जिथे हे जात होते शिवजी तेथून निघून जात असत. या अनुक्रमे, पाच पांडव आणि द्रौपदी एक दिवस महादेवाच्या शोधत हिमालयापर्यंत आले.

इकडे, जेव्हा महादेवांनी या लोकांना पाहिले तेव्हा ते लपून राहिले, परंतु युधिष्ठीरीने येथे भगवान शिवला लपताना पाहिले. तेव्हा युधिष्ठीराने भगवान शिव यांना सांगितले की तुम्ही कितीही लपून राहिले तरी प्रभु, आम्ही तुम्हाला पाहिल्याशिवाय येथून जाणार नाही आणि हे देखील मला माहित आहे की आम्ही पाप केले म्हणून आपण लपून बसले आहात.

युधिष्ठिरांनी असे म्हटल्यानंतर पांडव पुढे जाऊ लागले. त्याचवेळी त्यांच्यावर बैलाने जोरदार हल्ला केला. हे पाहून भीमाने त्याच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली. दरम्यान, बैलाने आपले डोके खडकांमधे लपविले, त्यानंतर भीमाने त्याची शेपूट खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बैलाचे धड डोक्यापासून वेगळे झाले आणि बैलाचं धड शिवलिंगात बदललं आणि काही वेळाने शिवलिंगातून भगवान महादेव प्रकट झाले. शिवने पांडवांची पापं माफ केली.

आजही या घटनेचा पुरावा केदारनाथच्या शिवलिंगा म्हणून उपस्थित आहे. भगवान शिव यांना समोर पाहून पांडव त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि त्यानंतर भगवान शिव यांनी पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगितला आणि मग ते अंतर्ध्यान झाले. त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज तेच शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते.

कारण शिवांनी स्वतः येथे पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला होता, म्हणूनच हिंदू धर्मात केदारनाथ हे मोक्षस्थळ मानले जाते. अशी मान्यता आहे की, जर कोणी केदारनाथ दर्शनाचा संकल्प घेऊन निघत असेल आणि जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.

Why Pandavas Built Kedarnath Temple Know The Pouranik Story Of Pandava And Mahadeva

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ravana | रावणाचा जन्म कसा झाला? ब्राह्मण पुत्र कुठल्या घटनेमुळे राक्षस ठरला? जाणून घ्या

Shree Ganesha | भगवान श्री गणेशाचे वाहन मूषक का? चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा…