ऑफिस बॅगमध्ये ‘या’ साध्या गोष्ठी ठेवत असाल तर, आजच व्हा सावध, धक्कादायक आहे कारण…

पुरुषच नाही तर, महिलांनी देखील व्हा सावध, ऑफिस बॅगमध्ये 'या' गोष्टी ठेवत असाल तर, आजच काढून ठेवा... धक्कादायक आहे कारण..., जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

ऑफिस बॅगमध्ये या साध्या गोष्ठी ठेवत असाल तर, आजच व्हा सावध, धक्कादायक आहे कारण...
फाईल फोटो
| Updated on: Nov 07, 2025 | 11:22 AM

पुरुषांसोबत ऑफिसला जाणाऱ्या महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला आज घर आणि स्वतःचं करियर सांभाळत आहेत. पण असंख्य प्रयत्न करून देखील काही महिलांना यश मिळत नाही… फक्त महिलांसोबतच नाही तर, असं अनेकदा पुरुषांसोबत देखील होते… लोक त्यांच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी दिवसरात्र काम करतात. प्रत्येकाला कामाच्या ठिकाणी ओळख, त्यांच्या बॉसकडून कौतुक आणि वेळेवर बढती हवी असते. परंतु अनेक वेळा, सर्व कठोर परिश्रम करूनही, यश मिळत नाही. याचं कारण ऑफिसच्या बॅगेतील काही वस्तू असू शकतात.

महिला अनेकदा त्यांच्या बॅगेत लिपस्टिक, मस्कारा किंवा छोटे दागिने ठेवतात. पण, ज्योतिषशास्त्रानुसार, या वस्तू शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत, तर ऑफिसमधील वातावरण बुध आणि मंगळ ग्रहाशी संबंधित मानलं जातं. यामुळे, या वस्तू तुमच्या एकाग्रतेवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात.

नेल कटर किंवा लहान चाकू बाळगणं ही एक सामान्य गोष्ट वाटू शकतं, परंतु वास्तुनुसार, या वस्तू संधी आणि नातेसंबंध “कापण्याचे” लक्षण मानले जातात. हे तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणू शकतात आणि लोकांशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात.

पुरुष अनेकदा त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये परफ्यूम किंवा डिओडोरंट ठेवतात. दररोज बॅगेत परफ्यूम किंवा डिओडोरंट बाळगल्याने तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. या उत्पादनांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण मानसिक एकाग्रतेला बाधा पोहोचवते. यामुळे ऑफिसमध्ये गांभीर्याचा अभाव निर्माण होतो आणि प्रगती मंदावते.

तुमच्या ऑफिस बॅगेत टूथब्रश, कंगवा किंवा इतर वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू ठेवणं अयोग्य मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, या वस्तू आजूबाजूच्या उर्जेवर परिणाम करतात, ऑफिसमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि तुमचं लक्ष विचलित करतात.

जर तुम्ही कधीकधी तुमच्या ऑफिस बॅगेत वापरलेले किंवा घाणेरडे कपडे ठेवत असाल तर ही सवय हानिकारक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे थकवा आणि चिडचिड होते. यामुळे तुमची एकाग्रता कमी होते.

जर तुम्हाला कामावर चांगली कामगिरी करायची असेल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचे असेल, तर तुमच्या ऑफिस बॅगमधील गोष्टींकडे लक्ष द्या. मग तुम्हाला तुमच्या नोकरीत यश मिळू शकते.

(टीप: वरील माहिती वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीच्या आधारे घेतली आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)