
हिंदू धर्मात, शास्त्रांमध्येही महिलांना लक्ष्मी मानले जाते. ज्या घरात महिलांचा अनादर केला जातो तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही असे म्हटले जाते. शिवाय, शास्त्रांमध्ये काही विशिष्ट कामे देखील नमूद केली आहेत जी महिलांनी रात्री करू नयेत असं म्हटलं जातं. कारण आपण दिवसभर जे काही करतो, ते चांगले असो वा वाईट, ते आपल्या जीवनावर आणि नशिबावर परिणाम करते. म्हणून, आपण चुकीच्या वेळी चुकीची कामे करणे टाळले पाहिजे. त्यामुळे असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने रात्रीच्या वेळी काही विशिष्ट गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. त्यामुळे घरात नकारात्मकता वास करू लागते. तसेच महिलेला आजारपण आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात.
महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी ही कामे चुकूनही करू नयेत
दही खाऊ नये
महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी दही खाऊ नये, तसेच बाहेरच्या कोणालाही दूध किंवा दही देऊ नये. अन्यथा घरात आर्थिक अडचणी येतात असे मानले जाते. असे केल्याने शुक्र ग्रह कमकुवत होतो असेही म्हटले जाते.
केस मोकळे ठेवून झोपू नये
कोणत्याही मुलीने किंवा महिलेने रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये. असे केल्याने वातावरणात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि त्यामुळे विविध आजार होऊ शकतात.
डोक्याजवळ पाण्याचं भांडं ठेवू नये
रात्रीच्या वेळी डोक्याजवळ पाण्याची बाटली किंवा कोणतेही पाण्याने भरलेलं भांडं ठेवू नयेत. असे केल्याने घरातील शांती आणि आनंद भंग होतो आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
झाडू मारू नये
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी घर झाडून घेण्याची सवय असते. पण असे करणे अशुभ मानले जाते. शक्यतो ते टाळावे. पण जर झाडून घेण्याची वेळ आलीच तरी देखील झाडून घेतल्यानंतर कचरा मात्र बाहेर टाकू नका. असे केल्याने आर्थिक अडचणी जाणवू शकतात.
केस विंचरणे
अनेक महिला झोपण्यापूर्वी केस विंचरतात. तथापि, शास्त्रांनुसार, महिलांनी सूर्यास्तानंतर केस विंचरू नये असे म्हटले जाते.
वादविवाद टाळा
महिलांनी रात्री भांडणे किंवा वाद घालणे टाळावे. खरं तर, संध्याकाळनंतर या गोष्टी टाळल्या पाहिजेत. रात्रीच्या भांडणामुळे केवळ झोपेवर नकारात्मक परिणाम होत नाही तर घरात मानसिक अशांतता आणि नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)