शनिवारच्या दिवशी अशी करा शनिदेवांची पूजा, शनिदोषापासून मिळेल मुक्ती

हिंदू धर्मामध्ये शनिवारचा दिवस हा शनिदेवांना समर्पित आहे. शनिदेवांना न्यायाची देवता तसेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखलं जातं. आज आपण शनि देवांची पूजा कशी करायची त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

शनिवारच्या दिवशी अशी करा शनिदेवांची पूजा, शनिदोषापासून मिळेल मुक्ती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2025 | 8:58 PM

हिंदू धर्मामध्ये शनिवारचा दिवस हा शनिदेवांना समर्पित आहे. शनिदेवांना न्यायाची देवता तसेच कर्मफळ दाता म्हणून देखील ओळखलं जातं. शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर तुम्ही शनि देवांची पूजा आणि प्रार्थना योग्य पद्धतीनं केली तर आयुष्यभर तुमच्यावर शनिदेवांची कृपा राहील, आयुष्यात तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही, मान सन्मान मिळेल तसेच तुमचं आरोग्य देखील उत्तम राहिल असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात शनिवारच्या दिवशी शनि देवांची पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे? त्याबद्दल.

शनिवारचं महत्त्व

शनिदेवांना सूर्य आणि चंद्रानंतर सर्वात जास्त प्रभावशाली ग्रह मानलं गेलं आहे. शनिची साडेसाती, शनि दोष किंवा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी शनि देवांची विशेष पूजा केली जाते. शनिवारचा दिवस हा हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देव यांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही जर नियमीतपणे शनिवारी शनि देवांची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील, तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक अडचण येणार नाही तसेच तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील दूर होऊन तुमच्या मनाला शांती मिळेल.

अशी करा शनि देवाची पूजा

शनिवारी तुमच्या घराच्या जवळ असलेल्या एखाद्या शनि मंदिरात जाऊन शनि देवांना काळे तीळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा. तसेच शनि मंदिरामध्ये तेलाचा दिवा लावा. शनिवारी काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाच्या छोट्या वस्तू, दान केल्यास शनि देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. सगळ्यात आधी शनि देवाच्या मूर्ती जवळ दिवा लावा. शनि मंत्राचा जप करा, शनि देवाला तेल आणि तीळ अर्पण करा.शनिवारी हनुमानाची देखील पूजा करा ज्यामुळे शनि दोषातून तुम्हाला मुक्ती मिळते.

शनिवारच्या दिवशी करण्याचे उपाय

ज्या व्यक्तींना शनिची साडेसाती आहे किंवा शनि दोष आहे, अशा व्यक्तींनी शनिवारी काळे वस्त्र परिधान करून शनि देवांची पूजा करावी. तसेच हनुमानाची देखील पूजा करावी, बजरंग बाणाचे पाठ करावेत. शनि देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावं, ज्यामुळे शनिदोष दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)