भारतात ‘ड्रोन तंत्रज्ञानात’ करिअरच्या अनेक संधी, चंदिगड विद्यापीठात प्रवेश घ्या, आणि ड्रोन पायलट बना!

| Updated on: Jul 04, 2022 | 8:30 PM

पुढील काही वर्षात ड्रोन उद्योगात 15-20% वाढ अपेक्षित आहे. यामुळे ड्रोन पायलटसाठी सुमारे 20% नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि दर महिन्याला सुमारे, 750-900 नोकऱ्यां उपलब्ध करून दिल्या जातील.

भारतात ‘ड्रोन तंत्रज्ञानात’ करिअरच्या अनेक संधी, चंदिगड विद्यापीठात प्रवेश घ्या, आणि ड्रोन पायलट बना!
चंदिगड विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जातं
Follow us on

नवी दिल्ली: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘ड्रोन तंत्रज्ञान’ ची (Drone Technology) जोरदार चर्चा आहे. ‘ड्रोन’ हे रोबोटिक्स, एरोस्पेस आणि मेकाट्रॉनिक्सचे (Robotics, aerospace and mechatronics) केंद्रबिंदू मानलं जाते. वितरण, व्हिडिओ रेकॉर्डिंग, लष्करी पाळत ठेवणं, मनोरंजनात्मक कार्यक्रम, हवामान विश्लेषण, वाहतुकीचं निरीक्षण, अग्निशमन आणि कृषी सेवा यासारख्या अनेक कामांसाठी ‘ड्रोन’ ला “अनपायलटेड एअरक्राफ्ट” म्हणून ओळखले जातं. भारतातील UAV (मानवरहित एरियल व्हेईकल) तंत्रज्ञानाच्या गगनाला भिडणाऱ्या लोकप्रियतेमुळे, विज्ञानाच्या क्षेत्रात या ड्रोन तंत्रज्ञानाची नेत्रदीपक वाढ होत आहे. त्यामुळेच भविष्यात कोट्यवधी उद्योगांना सुरु करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची गरज बोलून दाखवली जाते. ड्रोन तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वाढता वापर लक्षात घेता, भारतातही विविध विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. चंदिगड विद्यापीठाने (Chandigarh University) यासाठी पुढाकार घेत, ‘ड्रोन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आहे. भविष्यात या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

ड्रोन इंडस्ट्री वाढीचे घटक

व्यावसायिक जगतात क्रांतिकारी बदल घडत असताना भारतात ड्रोन इकोसिस्टम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अनेक संधी निर्माण करण्याचे आव्हान आहे.

• उपलब्ध आकडेवारीनुसार, पुढील वर्षात ड्रोन उद्योगात 15-20% वाढ अपेक्षित आहे. यामुळे ड्रोन पायलटसाठी सुमारे 20% नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि दर महिन्याला सुमारे, 750-900 नोकऱ्यां उपलब्ध करून दिल्या जातील.

हे सुद्धा वाचा

• कृषी, कायद्याची अंमलबजावणी, संरक्षण, पाळत ठेवणं आणि वाहतूक यासारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाच्या मते, सन 2026 पर्यंत $2 अब्ज महसूल निर्माण होईल.

ड्रोन फ्रेमिंग आणि वर्क मॉडेल

ड्रोन वायरलेस तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचा वापर करून बनवला जातो. ज्यात विविध उद्देशांसाठी ते डिझाइन केले जातात. त्यांचं आकार सामान्यतः विमानाच्या मॉडेलपासून ते तुमच्या तळहाताच्या आकारा एवढा असतं. जीपीएस प्रणाली आणि जॉयस्टिकसह प्रक्षेपित, ड्रोनला हाताळणे व्हिडीओ गेम खेळण्याइतकं सोपं आहे. ड्रोनचे वायरलेस तंत्रज्ञान युजर्संना रिअल-टाइम फूटेज देतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर पाळत ठेवणं, वा त्याचं रेकॉर्डिंग करणं सोपं होतं. ड्रोन उपकरणांचा सुलभ UI (युजर्स इंटरफेस) यूजरला ड्रोन उडवणं सोपं करतो. यामध्ये एक जायरोस्कोप, एक्सीलरोमीटर आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

व्हिडीओ पाहा

ड्रोन तंत्रज्ञानाची व्यापक कार्यप्रणाली

ड्रोन इंडस्ट्री आणि त्याचे अनेकविध ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या खासगी तसेच सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. भारत सरकार आणि त्यांचे प्रशासन विभाग 2020 पासून प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करतात, या द्वारे जमिनींची मोजणीही केली जाते. गावांचे नकाशे , सर्व्हे आणि त्या स्वामित्व निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग होते. सरकार पुढील 4 वर्षांच्या कालावधीत अंदाजे 6,60,000 गावांचे मॅपिंग करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखत आहे.

पंजाबमध्ये पहिले ड्रोन ट्रेनिंग हब

चंदिगड विद्यापीठ हे भारतातील NAAC (National Assessment and Accreditation Council) चं A+ मानांकन मिळवणाऱ्या 5 विद्यापीठांपैकी एक आहे. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी संशोधन-आधारित वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. पंजाबमधील पहिले “ड्रोन ट्रेनिंग हब” स्थापन करून, संस्थेने विद्यार्थी, उद्योग आणि सरकार यांना ड्रोन सशक्त प्रणाली तयार करण्याचं काम केलं आहे. यातून कुशल तंत्रज्ञ आणि ड्रोन पायलट घडवले जाणार आहेत. अशा प्रकारचे हे एक हब इच्छुकांना नाविन्यपूर्ण आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण घेण्याची किफायतशीर संधी प्रदान करत आहे. तुम्हाला ड्रोन तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यायचे असल्यास, आजच चंदीगड विद्यापीठातील पहिल्या ड्रोन हबमध्ये प्रवेश घ्या.