
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते ते म्हणजे फक्त आणि फक्त पर्यटक. हेच नाही तर त्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले. कलमा वाचण्यास सांगितले. ज्या पर्यटकांना कलमा वाचता आला नाही, त्यांच्यावर धड..धड गोळ्या झाडल्या. या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली. डोळ्या देखत घरातील पुरूषांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. पहलगामवरील हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. भारताचे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. लष्कराकडून अजूनही सांगितले जात आहे की, ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे. मात्र, या तणावाच्या काळात भारत आण पाकिस्तान क्रिकेट सामना रंगतोय. अनेक लोक या सामन्याला जोरदार विरोध करताना दिसत आहेत.
आशिया कपमध्ये उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर येणार आहेत. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 18 वेळा सामने झाली असून यापैकी भारताने तब्बल 10 वेळा विजय मिळवला. उद्याचा सामना जिंकणे भारतासाठी थोडे कठीण आहे. त्याची तीन मोठी कारणे आहेत, जी भारतासाठी घातल ठरू शकतात.
आशिया कपमध्ये पाकिस्तान संघातील जवळपास खेळाडू ही तरूण आणि नवीन आहेत. सॅम अयुब आणि साहिबजादा फरहान या सलामी जोडीने काही दिवसांपासून चांगली कामगिरी केलीये. याचा मोठा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. मोहम्मदने ओमानविरुद्ध वादळी पद्धतीने खेळी करून तब्बल 63 धावा केल्या. या सलामीच्या जोडीची भागीदारी रोखणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. पूर्ण सामनाच ही जोडी पलटू शकते.
न्यूझीलंडचे दिग्गज प्रशिक्षक माइक हेसन यांनी पाकिस्तान संघाचे सूत्र हातात घेतले असून त्यांनी काही महत्वाचे बदल केली आहेत. मोठा अनुभव माइक हेसन यांच्याकडे आहे. माइक हेसन यांच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला होता. यामुळे पाकिस्तानचे पारडे भारतापेक्षा अधिक जड नक्कीच आहे.
युएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळतंय. पाकिस्तानच्या संघात असे तब्बल पाच फिरकी गोलंदाज आहे. हा देखील मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर टिकण्याचे मोठे आवाहन हे भारतीय क्रिकेटपटूंसमोर असणार हे स्पष्ट आहे.