T20 World Cup 2022 : दुबळ्या आर्यलॅंड टीमने ऑस्ट्रेलिया टीमला दिला धक्का, महत्त्वाचे तीन खेळाडू आऊट

एरोन फिंच सध्या 40 धावांवर खेळत आहे.

T20 World Cup 2022 : दुबळ्या आर्यलॅंड टीमने ऑस्ट्रेलिया टीमला दिला धक्का, महत्त्वाचे तीन खेळाडू आऊट
ARON FINCH
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 31, 2022 | 2:55 PM

ब्रिस्बेन : सुरुवातीला फलंदाजी करीत असताना 12 ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियाचे (Australia) तीन महत्त्वाचे खेळाडू बाद झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीम आजच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये (Match) किती धावसंख्या करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 12 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया टीमकडून 87 धावा काढल्या आहेत. आर्यलॅंड (ire) टीमकडून अद्याप चांगली गोलंदाजी करण्यात आली आहे.

ग्लेन मैक्सवैल, डेविड वॉर्नर, मार्श हे खेळाडू आऊट झाले आहेत. तर मार्कस स्टोइनिस एरोन फिंच सध्या फलंदाजी करीत आहेत. एरोन फिंच सध्या 40 धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलिया टीम

डेविड वार्नर, एरोन फिंच, मिशेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मैथ्यू वेड, पैट कमिंस, एडम ज़म्पा, मिशेल स्टार्क, जोश हेज़लवुड

आर्यलॅंड टीम

पॉल स्टर्लिंग, एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर, हैरी टेक्टर, कर्टिस कैंपर, जॉर्ज डॉकरेल, गैरेथ डेलानी, मार्क अडायर, बैरी मैकार्थी, फिओन हैंड, जोशुआ लिटिल