IPL 2020 | ‘मिस्टर 360’ एबी डीव्हिलियर्सची विक्रमाला गवसणी, ख्रिस गेलचा विक्रम मोडित

| Updated on: Oct 13, 2020 | 7:24 PM

बंगळुरुच्या एबी डीव्हिलियर्सने कोलकाताविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 73 धावांची स्फोटक खेळी केली.

IPL 2020 |  मिस्टर 360 एबी डीव्हिलियर्सची विक्रमाला गवसणी, ख्रिस गेलचा विक्रम मोडित
Follow us on

शारजा : रविवारी 12 ऑक्टोबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरुने कोलकाताचा 82 धावांनी धुव्वा उडवला. यासामन्यात बंगळुरुकडून एबी डीव्हिलियर्स (Ab deVilliers) आणि विराट कोहलीने (Virat kohli) तडाखेदार नाबाद 100 धावांची भागीदारी केली. एबीडीने 33 चेंडूत नाबाद 73 धावांची स्फोटक खेळी केली. यासह एबीडीने युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. (Ab Devilliers Breaks Chris Gayle’s Most Man Of The Match Award In Ipl)

काय आहे रेकॉर्ड ?

कोलकाता विरुद्धात केलेल्या खेळीसाठी एबीडीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह एबीडी आयपीएलमधील सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार आयपीएलमध्ये एबीडी 22 मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसह पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाबचा खेळाडू ख्रिस गेल आहे. गेल 21 वेळा सामनावीर राहिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने आतापर्यंत एकूण 17 वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे.

विराट-एबीडीचा अनोखा विक्रम

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली- एबी डीव्हिलयर्स जोडीने अनेक रेकॉर्ड केले. या जोडीने कोलकाता विरुद्ध नाबाद 100 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह एबीडी-विराट या जोडीने आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत या जोडीने अनेकदा भागीदारी केली आहे. यासर्व भागीदारीतील एकूण धावा मिळवून 3 हजार धावा या जोडीने केल्या आहेत. याआधी आतापर्यंत विराट कोहली आणि ख्रिस गेल या जोडीने भागीदार म्हणून 2 हजार 782 धावा केल्या आहेत. तर शिखर धवन आणि डेव्हिड वार्नरने 2 हजार 357 धावा केल्या आहेत. तसेच एबीडी-विराट जोडीने आयपीएलमध्ये 10 वेळा शतकी भागीदारी करण्याचाही विक्रम केला आहे.

बंगळुरु प्लेऑफच्या शर्यतीत

बंगळुरु प्लेऑफसाठीची प्रबळ दावेदार मानली जात आहे. बंगळुरुने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान बंगळुरु यंदाच्या मोसमातील आपला पुढील सामना किंग्जस इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | एबी डीव्हीलियर्स-विराट कोहलीचा किर्तीमान, शतकी भागीदारीसह विक्रमाची नोंद

(Ab Devilliers Breaks Chris Gayle’s Most Man Of The Match Award In Ipl)