36 दिवसांनी जामिनावर तुरुगांतून बाहेर आला अन् थेट सेंच्युरी मारली, मैदानावर बसला अन् ढसाढसा रडला

अभिषेक तब्बल ३६ दिवस कोठडीत काढल्यानंतर आता मैदानात जेव्हा तो परतला तेव्हा त्याने धुमाकुळ घातला. थेट शतक ठोकले आणि नंतर मैदानावर बसला अन् ढसाढसा रडू लागला.

36 दिवसांनी जामिनावर तुरुगांतून बाहेर आला अन् थेट सेंच्युरी मारली, मैदानावर बसला अन् ढसाढसा रडला
| Updated on: Oct 13, 2026 | 10:14 AM

बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलने दिल्लीविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार शतक झळकावले. पोरेल मैदानावर गुडघे टेकून रडू लागला. काही काळापासून कायदेशीर कारवाईला सामोरे जात असलेल्या पोरेलने सांगितले की, त्याला रडायचे नव्हते, पण तो आपले अश्रू रोखू शकला नाही. तो म्हणाला की या कठीण काळात तो मानसिकदृष्ट्या अधिक कणखर झाला आहे.

दिल्लीविरुद्धच्या रणजी ट्रॉफी गट ‘क’ सामन्यात पोरेलने उत्कृष्ट फलंदाजी केली. शतक पूर्ण केल्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “मला रडायचे नव्हते, पण अश्रू आपोआपच बाहेर आले.” त्याने हे स्पष्ट केले की, कोणत्याही वादावर भाष्य करण्याऐवजी त्याला आपल्या बॅटनेच उत्तर द्यायचे होते. त्याचे संपूर्ण लक्ष केवळ क्रिकेट खेळण्यावर आणि चांगली कामगिरी करण्यावर आहे.

Loading...

पोरेल म्हणाला की, “या कठीण काळात तो खूप काही शिकला. या अनुभवांनी त्याला मानसिकदृष्ट्या अधिक कणखर बनवले. फलंदाजी करतानाही, तो नेहमी विचार करत असे की कोणाला काही बोलण्याऐवजी, धावा करून प्रत्युत्तर दिले पाहिजे.”

दिल्लीचा पहिला डाव २४० धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, बंगालने शानदार फलंदाजी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत, संघाने ७९ षटकांत ३ गडी गमावून ३०४ धावा केल्या होत्या. सुदीप कुमार घरामीने १२२ धावा केल्या आणि अभिषेक पोरेल ११४ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९९ धावांची अभेद्य भागीदारी करून बंगालला मजबूत स्थितीत आणले.

पोरेलवर काय आरोप आहेत?

कर्नाटकातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीने २३ जून रोजी पोरेलविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या महिलेने दावा केला की, ते सुमारे साडेतीन वर्षांपासून नात्यात होते आणि लग्नाची योजना आखत होते. नंतर तिने असा आरोप केला की पोरेलने हे नाते नाकारले. या प्रकरणात बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप आहेत. एका तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. २० जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने पोलिसांना पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. ३६ दिवस तो जेलमध्ये राहून आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us