Hong Kong Sixes 2025 मध्ये भारताची वाईट अवस्था, कुवेत पाठोपाठ UAE सारख्या छोट्या टीमकडून भारतीय संघ पराभूत

Hong Kong Sixes 2025 : हाँग काँग इंटरनॅशनल सिक्सेस 2025 टुर्नामेंटमध्ये भारताची खराब स्थिती आहे. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 42 धावा फटकावूनही फायदा झाला नाही. कुवेत पाठोपाठ यूएईकडून बलाढ्य भारताला पराभव स्वीकारावा लागला.

Hong Kong Sixes 2025 मध्ये भारताची वाईट अवस्था, कुवेत पाठोपाठ UAE सारख्या छोट्या टीमकडून भारतीय संघ पराभूत
India Lost Against UAE
Image Credit source: Hong Kong Sixes
| Updated on: Nov 08, 2025 | 12:28 PM

हाँग काँग इंटरनॅशनल सिक्सेस 2025 टुर्नामेंटची भारताने शानदार सुरुवात केली होती. टुर्नामेंटच्या सुरुवातीलाच भारताने पाकिस्तान सारख्या मजबूत प्रतिस्पर्ध्याला हरवून सर्वांच मन जिंकलं. पण दुसऱ्याचदिवशी नशीब बदललं. पूल सी च्या एका सामन्यात कुवेतकडून टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर बॉल राऊंडच्या पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. मिशन रोड ग्राऊंड, मॉन्ग कॉक येथे हा सामना झाला. या सामन्यात UAE च्या टीमने एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीमला पराभवाचा झटका दिला. यूएईने भारताला चार विकेट राखून हरवलं.

दोन्ही टीम्समध्ये 6-6 ओव्हरचा सामना झाला. यूएईने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. हा निर्णय यूएईसाठी योग्य ठरला. भारताने लवकर विकेट गमावल्याने अडचणी वाढल्या. ओपनर भरत चिपली फक्त चार रन्स बनवून नीलांश केस्वानीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. पुढच्याच चेंडूवर स्टूअर्ट बिन्नी खातं न उघडताच नीलांश केस्वानीचा दुसरा विकेट ठरला. त्यानंतर प्रियांक पंचालने फक्त एक चेंडू खेळला. त्यानंतर तो बाद झाला. भारताचा हा तिसरा विकेट होता. 1.4 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावात भारताचे तीन विकेट गेले होते. असं वाटतं होतं की, भारताचा डाव लवकर आटोपणार.

हे टार्गेट यूएईसमोर छोटं ठरलं

पण अभिमन्यू मिथुन आणि दिनेश कार्तिकने डाव सावरला. अभिमन्यू मिथुनने रिटायर्ड हर्ट होण्याआधी 16 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यात चार फोर आणि पाच सिक्स होते. दुसऱ्याबाजूला दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 42 धावा ठोकल्या. यात त्याने चार फोर आणि चार सिक्स मारले. भारताने 6 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 107 धावा केल्या. पण हे टार्गेट यूएईसमोर छोटं ठरलं.

यूएईकडून कोणी फटकेबाजी केली?

या टार्गेटचा पाठलाग करताना यूएईने जोरदार सुरुवात केली. यूएईचा कॅप्टन खालिद शाहने फक्त 14 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार फोर आणि पाच सिक्स होते. सगीर खानने 11 चेंडूत 31 धावा फटकावून सामना यूएईच्या बाजूने वळवला. त्यानंतर मुहम्मद अरफानने 5 चेंडूत 20 धावा काढून टीमला विजयाच्या समीप पोहोचवलं. यूएईने हे टार्गेट 5.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून पार केलं.