IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभव झाल्यानंतर हा बांगलादेशी खेळाडू रडू लागला, चाहत्यांना सुद्धा अनावर झालं

टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 184 झाली होती.

IND vs BAN T20 WC: भारताकडून पराभव झाल्यानंतर हा बांगलादेशी खेळाडू रडू लागला, चाहत्यांना सुद्धा अनावर झालं
IND vs BAN T20 WC
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 03, 2022 | 12:41 PM

एडिलेड : T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाचे (Team India) आतापर्यंत तीन रोमांचक सामने झाले आहेत. त्यापैकी दोन मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. काल बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये (Bangladesh) इंडिया टीम अंतिम ओव्हरमध्ये जिंकली. मैदानात मॅच पाहणारे चाहते नेमका कोणाचा विजय होणार याकडे आतुरतेने वाट पाहत होते. पण टीम इंडियाचा विजय झाला, आणि बांगलादेश चाहत्यांना रडू अनावर झालं.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 184 झाली होती. कालच्या मॅचमध्ये केएल राहूल आणि विराट कोहली आणि सुर्यकुमार या तीन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली.

विशेष म्हणजे कालच्या सामन्यात बांगलादेशच्या खेळाडूंनी सुद्धा चांगली सुरुवात केली होती. पहिल्या पॉवरप्लेमध्ये बांगलादेश टीमच्या 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुद्धा टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली.

ज्यावेळी मैदानात पाऊस येऊन गेला, त्यानंतर बांगलादेश टीमच्या विकेट पडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर बांगलादेशच्या चाहत्यांचे चेहरे पडायला सुरुवात झाली होती. ज्यावेळी मॅच बांगलादेश टीमचा पराभव झाला. त्यावेळी तस्कीन अहमद आणि चाहत्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं.