पाकिस्तानी टीममध्ये आणखी एक शोएब मलिक, सानिया प्रेग्नेंट असताना दिला धोका!

पाकिस्ताचा माजी ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केली. लग्न झालेलं असतानाही दुसरं अफेअर केलं. आता शोएबच्या एका माजी सहकाऱ्याने त्याच्याच पावलावर पाऊल टाकत प्रेग्नेंट पत्नीला धोका दिलाय.

पाकिस्तानी टीममध्ये आणखी एक शोएब मलिक, सानिया प्रेग्नेंट असताना दिला धोका!
imad wasim cheating pregnant wife
Image Credit source: Getty Images and Instagram
| Updated on: Jul 21, 2025 | 12:15 PM

पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा कुठल्या ना कुठल्या वादात सापडतात. भारताची दिग्गज टेनिस खेळाडू सानिया मिर्झाची पाकिस्तानी ऑलराऊंडर शोएब मलिकने फसवणूक केली. शोएब मलिकने सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं. आता शोएब मलिकचा माजी सहकारी इमाद वसीमवर सुद्धा पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. वसीम पत्नी सानिया अशफाकला धोका देत आहे असं आरोप पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनी केला आहे. काही दिवसांपूर्वी इमाद वसीमच्या पत्नीने तिसऱ्या बाळाला जन्म दिला. त्याचवेळी दुसऱ्याबादूला इमाद वसीमवर पत्नीची फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत.

इमाद वसीम t20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी टीमचा भाग होता. इमाद वसीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ लंडनमधला असल्याच सांगण्यात येतय. त्यात इमाद एका महिलेसोबत दिसतोय. ही महिला एक वकील असल्याच सांगण्यात येतय. ती इंफ्लुएंसर सुद्धा आहे. नायला राजा तिचं नाव आहे. इमाद आणि नायलाच बऱ्याच काळापासून अफेअर सुरु असल्याच सांगण्यात येतय.

पत्नी प्रेग्नेंट असताना दुसरीसोबत अफेअर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’पासून इंस्टाग्रामपर्यंत पाकिस्तानी यूजर्स इमादवर वेगवेगळे आरोप करत आहेत. त्याच्यावर भरपूर टीका सुद्धा होतेय. पत्नी प्रेग्नेंट असल्यापासून इमाद तिला धोका देतोय असा आरोप करण्यात येतोय. इमादने अशावेळी पत्नीसोबत असायला पाहिजे होतं. पण तो पत्नीला फसवून नायलासोबत अफेअरमध्ये गुंतला होता असा दावा केला जातोय.


हे आरोप खरे का वाटतात?

इमादला आधीपासून दोन मुलं आहेत. जुलै महिन्यात त्याच्या घरी पुन्हा पाळणा हलला. 18 जुलैला सानिया अशफाकने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर नवजात बाळाचा फोटो पोस्ट केला होता. इमादवर होत असलेले आरोप यासाठी खरे वाटतात, कारण सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहिलेलं की, ‘तेच सर्वात चांगले आहेत, जे आपल्या पत्नीसाठी सर्वात चांगले आहेत’ सानियाच्या या पोस्टवरुन इमादने तिची फसवणूक केल्याचे संकेत मिळत आहेत.


सोशल मीडिया युजर्सवर तिने राग काढलाय

या आरोपांवर इमाद वसीमकडून कुठलही स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा त्याने हे वृत्त फेटाळून सुद्धा लावलेलं नाही. पण नायला राजाच एक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावर नायलाने अफेअरचे आरोप खोडून काढले आहेत. सोशल मीडिया युजर्सवर तिने राग काढलाय. व्हायरल व्हिडिओचा फक्त एक भाग दाखवला जात आहे. तिने म्हटलय की, उगाचच माझ्या नावाने दावे करु नका. कारण याच्याशी तिचं काही देण-घेणं नाही.