निळ्या समुद्रात अनाया बांगरची सफर, बिकिनी लूकची तुफान चर्चा, Video व्हायरल

Anaya Bangar : अनाया बांगरने बिकिनी परिधान करून स्टीमर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने काही फोटोही पोस्ट केले आहेत.

निळ्या समुद्रात अनाया बांगरची सफर, बिकिनी लूकची तुफान चर्चा, Video व्हायरल
Anaya Bangar Bikini Video
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 10:04 PM

गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर ही चर्चेत आहे. अलिकडेच तिला ऑस्ट्रेलियात कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला काही स्तरातून विरोधही झाला होता. मात्र आता अनाया बांगरने एका वेगळ्याच कारणामुळे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिने बिकिनी परिधान करून स्टीमर चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने काही फोटोही पोस्ट केले आहेत.

अनायाने शेअर केलेला व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हिडिओला 31 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर तिच्या फोटोंनाही जवळपास 35 हजार लाईक्स मिळाले आहेत. याआधीही अनायाने बिकिनीतील एक व्हिडिओ शेअर करत आपल्या शरीराविषयी भावना व्यक्त केल्या होत्या.

आता हे शरीर मला माझ्या घरासारखे वाटते

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनायाने लिहिले होते की, ज्या शरीराला स्वतःचे म्हणून स्वीकारण्यासाठी तिने संघर्ष केला, तेच शरीर आता तिला घरासारखे वाटते. स्वतःला आपण नेहमी जसे आहोत असे वाटत आले, तसेच जाणवण्यात एक वेगळे सौंदर्य असल्याचे तिने म्हटले होते. यालाच ‘जेंडर यूफोरिया’ म्हणतात, असेही तिने सांगितले.

मुंबईकडून खेळले क्रिकेट

लिंगपरिवर्तनापूर्वी अनाया आर्यन बांगर या नावाने क्रिकेट खेळत होती. तिने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, लिंगपरिवर्तनानंतर तिला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आता ऑस्ट्रेलियात कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाल्यामुळे तिच्यासाठी क्रिकेटचे मार्ग पुन्हा खुले होताना दिसत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने केला होता विरोध

ऑस्ट्रेलियाने अनायाला कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची माजी महिला क्रिकेटपटू मेरिझान कॅप हिने या निर्णयावर आक्षेप घेतला होता. ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये, असे मत तिने व्यक्त केले होते. आता अनाया बांगर भविष्यात मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळताना दिसणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर ती महिला बिग बॅश लीगमध्ये खेळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us