AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Bank Cyber Attack : SBI बँकेवर सायबर हल्ला? खातेधारकांची सर्व माहिती लीक, थेट बँकेनेच ग्राहकांना..

SBI खातेधारकांची संपूर्ण माहिती डार्क बेववर लिक झाली आहे. बँकेने सायबर अटॅक झाल्याचे स्पष्ट केले आहे. लिक झालेल्य गोष्टींमध्ये ग्राहकाचा नंबर, ई- मेल, घरचा पत्ता, जन्मतारीख लिक झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अनोळखी नंबर वरून बँकेसंबंधित येणारे कॉल्स किंवा लिंकवर क्लिक करू नये अश्या सूचना जारी केल्या आहेत

SBI Bank Cyber Attack :  SBI बँकेवर सायबर हल्ला? खातेधारकांची सर्व माहिती लीक, थेट बँकेनेच ग्राहकांना..
sbi cyber attackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 2:27 PM
Share

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या ग्राहकांच्या डेटावर सायबर अटॅक झाला आहे. या संबंधित बातमी बँकेने जाहीर केली आहे. बँकेच्या प्राथमिक तपासात डार्क वेबवर SBI च्या ग्राहकांचा डेटा लिक झाला आहे. डार्क वेबवर 3,897 ग्राहकांचा डेटा लिक झाला आहे. यामध्ये ग्राहकांशी संबंधित नावं, मोबाईल नंबर, ई- मेल आणि घरचे पत्ते यांसारख्या माहितीचा समावेश आहे. या प्रकरणी बँक सखोल चौकशी करत आहे.

डार्क वेब म्हणजे काय?

डार्क बेव म्हणजे इंटरनेटचा असा भाग जो सामान्य शोध इंजिनवर दिसत नाही. तिथे निनावीपणे बेकायदेशीर व्यवहार चालतात. हॅकर्स चोरी केलेली माहिती डार्क वेबवर विक्रिसाठी किंवा लूटण्यासाठी ठेवतात.

नेमकी कोणती माहिती उघड झाली?

SBI ने 21 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार डार्क वेबवर 3 लाख नोंदीच्या तपासात तब्बल 3, 897 SBI च्या ग्राहकांच्या नोंदी आढळल्या आहेत. या नोंदीमध्ये ग्राहकांची नावं, जन्मतारीख, लिंग, नोंदणीकृत मोबाईल नंबर,ई – मेल आणि घरचे पत्ते यांसारख्या माहितीचा समावेश आहे.

याशिवाय बँकेच्या शाखेशी संबंधित माहिती, ग्राहक ओळख क्रमांक ( CIF ) लीड आयडी आणि कर्जाशी संबंधित नोंदीचा तपशीलही लीक झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र किती प्रमाणात माहिती प्रत्यक्षात उघड झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बँकेला डेटा लिकची माहिती समजताच सायबर सुरक्षेशी संबंधित प्रक्रिया सूरू केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीची जबाबदारी SBI बँकेने CERT- In या सायबर सुरक्षा संस्थेकडे दिली आहे. माहिती खरचं लिक झाली आहे का? ती कुठून लिक झाली? तिचा ग्राहकांवर किती परिणाम होऊ शकतो? याची तपासणी केली जात आहे.

या घटनेनंतर ग्राहकांच्या मनात खात्यातील पैश्याविषयी आणि बँकिग व्यवहारांविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण SBI बँकेने स्पष्ट केले आहे की, या घटनेचा बँकेच्या मुख्य कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. बँकेचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं बँकेने सांगितलं आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दरम्यान ग्राहाकांनी अनोळखी व्यक्तीकडून येणारे बँकेसंबंधिक कॉल्स, मेसेज, किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. सावध राहणं गरजेचे आहे. कोणालाही ओटीपी, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित माहिती देऊ नका.

Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान