
मुलगा ते मुलगी असा प्रवास केलेल्या अनाया बांगरने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना खुश केलं आहे. अनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. पण तिच्या एका चाहत्याने तिच्याकडे एक साडी नेसून फोटो पोस्ट करण्याची विनंती केली होती. तिने तिच्या चाहत्याची हीच इच्छा पूर्ण केली आहे. अनया बांगरने पहिल्यांदाच साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अनायाचा साडीतला फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
अनायाचे सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट केले होते पण साडीत एकही फोटो दिसला नव्हता. गेल्या महिन्यात 2 जुलै रोजी शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने तिला साडीत फोटो शेअर करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनंतर आता एका महिन्यानंतर अनायाचा साडीतला फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
अनाया बांगरने नेसली आईची साडी
अनया बांगरने 6 ऑगस्ट रोजी साडी नेसलेला तिचा फोटो पोस्ट केला आणि त्या साडीची एक खासियतही सांगितली. तिने सांगितले की तिने जी साडी नेसली आहे ती तिच्या आईची आहे. अनया बांगरचा साडी नेसलेला हा फोटो म्हणजे तिच्या एका चाहत्याने केलेली विनंती होती. त्या विनंतीचा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता.
साडी नेसणाऱ्या अनायाला सुंदरी नाव मिळालं
अनाया बांगर या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. म्हणूनच एका चाहत्याने तिचे नाव सुंदरी ठेवले आहे. दरम्यान अनाया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. मग ते भारतीय कपडे घालणे असो किंवा मेहंदी लावणे असो. अनायाची प्रत्येक स्टाईल तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळते. पण पहिल्यांदाच तिला साडीत पाहून नेटकऱ्यांनाही छान वाटलं.