मयंकचं अर्धशतकी पदार्पण ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा युवा फलंदाज मयंक अग्रवालने अर्धशतकी पदार्पण साजरं केलं. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणात अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबाव झुगारत पदार्पणाच्या सामन्यातच अग्रवालने 76 धावांची खेळी केली. मयंक अग्रवालने आंतरराष्ट्रीय पदार्पण अर्धशतकाने साजरं केलं असलं तरी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंचा मात्र तिळपापड झालाय. ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर केरी ऑकीफ […]

मयंकचं अर्धशतकी पदार्पण ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी
Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा युवा फलंदाज मयंक अग्रवालने अर्धशतकी पदार्पण साजरं केलं. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणात अर्धशतक ठोकणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबाव झुगारत पदार्पणाच्या सामन्यातच अग्रवालने 76 धावांची खेळी केली.

मयंक अग्रवालने आंतरराष्ट्रीय पदार्पण अर्धशतकाने साजरं केलं असलं तरी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंचा मात्र तिळपापड झालाय. ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर केरी ऑकीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी चांगलेच संतापले आहेत. कॉमेंट्री करताना शेन वॉर्न आणि मार्क हॉवर्ड यांच्यासोबतच ऑकीफनेही भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटवर टिप्पणी केली.

मयंकने प्रथम श्रेणीमध्ये त्रिशतक ठोकलं होतं. हे शतक त्याने कँटिन स्टाफ किंवा वेटरविरुद्ध खेळताना केलं असेल, असं वक्तव्य ओकीफने केलं. हे वक्तव्य करतानाच त्यांनी भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचीही थट्टा उडवली. मयंक अग्रवालने नोव्हेंबर 2017 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळताना नाबाद 304 धावांची खेळी केली होती.

यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉनेही उपहासात्मक वक्तव्य केलं. भारतात मयंकची सरासरी 50 आहे, जी ऑस्ट्रेलिया 40 च्या बरोबरीत आहे, असं वॉ म्हणाला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे मयंक अग्रवालची भारतीय संघात निवड करण्यात आली. मेलबर्न कसोटीपर्यंत त्याने 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये 75 सामन्यात त्याची सरासरी 50 ची होती. भारतीय अ संघासाठीही त्याने चांगली कामगिरी केली होती.

भारतीय क्रिकेटप्रेमींनी ओकीफच्या वक्तव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर्सच्या या वक्तव्याचा अजून कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. ओकीफने ऑस्ट्रेलियासाठी 1971 ते 1977 या काळात 24 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 53 विकेट्स आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत तो मार्क वॉसोबत फॉक्स स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे.